NZvsIND: भारताच्या विजयाचे स्वप्न भंगले! न्यूझीलंडविरुद्धचा पहिला कसोटी सामना अनिर्णीत, 12 वर्षांची प्रतीक्षा कायम
न्यूझीलंड आणि भारत यांच्यात वेलिंग्टन येथे खेळला गेलेला पहिला कसोटी सामना अनिर्णीत राहिला. यामुळे भारतीय संघांचा न्यूझीलंडमधील १२ वर्षांचा कसोटी सामना जिंकण्याची प्रतीक्षा कायम राहिली आहे.
वेलिंग्टनच्या बेसिन रिझर्व्ह येथे हा सामना गुरूवारीपासून (१९ नोव्हेंबर) खेळला जात होता. आज (२३ नोव्हेंबर) सामन्याचा पाचवा आणि अंतिम दिवस होता. भारताने या सामन्यात पहिल्या डावात ७२० धावांचा डोंगर उभा केला होता. त्यामुळे एका क्षणी असे वाटत भारत सहज जिंकेल, मात्र रचिन रवींद्र-डेव्हॉन कॉनवे आणि डॅरिल मिचेल -ग्लेन फिलिप्स यांच्या चिवट फलंदाजीमुळे भारताने मालिकेत आघाडी घेण्याचे स्वप्न भंगले.
मालिकेचा निकाल ठरवणारा दुसरा कसोटी सामना शुक्रवारी (२७ नोव्हेंबर) सुरू होत आहे.
(बातमी अपडेट होत आहे…)
Comments are closed.