न्यूझीलंडचा 61 धावांनी दणदणीत विजय,श्रीलंकेचा सलग दुसरा पराभव अन् टी 20 वर्ल्ड कमधून बाहेर
कोलंबो: टी 20 वर्ल्ड कपचं आयोजन करणाऱ्या श्रीलंकेचा प्रवास अखेर संपला आहे. न्यूझीलंड विरुद्ध सुपर 8 मध्ये पराभव झाल्यानं श्रीलंकेचं आव्हान संपलं आहे. श्रीलंकेचा सुपर 8 मधील हा दुसरा पराभव ठरला. न्यूझीलंडनं प्रथम फलंदाजी करताना 7 बाद 168 धावा केल्या. या धावांचा पाठलाग करण्यात श्रीलंकेला अपयश आलं. श्रीलंका 20 ओव्हरमध्ये 8 बाद 107 धावा करु शकली. यामुळं न्यूझीलंडनं श्रीलंकेला 67 धावांनी पराभूत केलं.
श्रीलंकेचा कर्णधार दसून शनाका यानं टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. तो निर्णय श्रीलंकेला महागात पडल्याचं पाहायला मिळालं. न्यूझीलंडची 84 धावांवर 6 विकेट अशी बिकट स्थिती झाली होती. मात्र त्यानंतर न्यूझीलंडचा कॅप्टन मिशेल सँटनर आणि कोल मॅककॉन्ची या दोघांनी केलेल्या भागीदारीमुळं त्यांनी 20 ओव्हरमध्ये 7 बाद 168 केल्या. मिशेल सँटनर यानं 47 धावा, कोल मॅककॉन्ची यानं 31 धावा केल्या. याशिवाय रचनि रविंद्र यानं 32 आणि फिन एलन यानं 23 धावा केल्या.
न्यूझीलंडनं विजयासाठी दिलेलं आव्हान पार पकरण्यात श्रीलंकेला अपयश आलं. श्रीलंकेची टॉप ऑर्डर, मधील फळीतील फलंदाज फार चांगली कामगिरी करु शकले नाहीत. पथुम निसांका खातं देखील उघडू शकला नाही. कुशल मेंडिस 11, चरीथ असलंका 5, पवन रथनायके 10, कमिंदू मेंडिस 31, दासून शनाका 3 धावांवर बाद झाला. दुनिथ वेल्लालागे यानं श्रीलंकेचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याला यश आलं नाही. रचिन रविंद्र यानं श्रीलंकेच्या चार विकेट घेतल्या.
न्यूझीलंड विरुद्ध झालेल्या पराभवानंतर श्रीलंकेचं टी 20 वर्ल्ड कपमधील आव्हान संपलं आहे. तर, श्रीलंका पराभूत झाल्यानं पाकिस्तानी उपांत्य फेरीची वाट देखील बिकट झाली आहे.
सुपर 8 च्या ग्रुप 2 मध्ये रंगत
सुपर 8 च्या ग्रुप 2 मध्ये इंग्लंड, श्रीलंका, पाकिस्तान आणि न्यूझीलंडचा समावेश आहे. यापैकी इंग्लंडनं दोन सामने जिंकत उपांत्य फेरीत धडक दिली आहे. आता श्रीलंकेचा संघ दोन पराभवांमुळं स्पर्धेबाहेर गेला आहे. आता पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यातील एक संघ उपांत्य फेरीत पोहोचेल. न्यूझीलंडचे आता 3 गुण झाले आहेत. पाकिस्तानकडे 1 गुण आहे. दोन्ही संघांचे एक एक सामने बाकी आहेत. न्यूझीलंड आणि इंग्लंड यांच्यात एक मॅच व्हायची आहे. ती मॅच न्यूझीलंडनं जिंकल्यास पाकिस्तान बाहेर जाईल. तर, पाकिस्तानचा विचार केल्यास त्यांना श्रीलंकेला मोठ्या फरकानं पराभूत करावं लागेल. दुसरीकडे इंग्लंडनं न्यूझीलंडला पराभूत करावं लागेल. तर, पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यात नेट रनरेट चांगला असणारा संघ उपांत्य फेरीत पोहोचेल.
श्रीलंकेची खराब कामगिरी कायम
ऑस्ट्रेलियासारख्या दिग्गज संघाला पराभूत करत सुपर 8 मध्ये प्रवेश करणाऱ्या श्रीलंकेची त्यानंतर समाधानकारक कामगिरी पाहायला मिळाली नाही. इंग्लंड विरुद्धच्या सामन्यात श्रीलंकेला विजयासाठी 147 धावा करायच्या होत्या त्यावेळी श्रीलंका 17 व्या ओव्हरमध्येच 95 धावांमध्ये बाद झाली होती.
आणखी वाचा
Comments are closed.