लक्ष्मण हकनवार चप्पलफेक!

ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्यावर गेवराईत जमावाने चप्पलफेक केली. हाके यांच्या गाडीवर दगडफेकही करण्यात आली. जमावाचा रोष पाहून पोलिसांनी लक्ष्मण हाके यांना संरक्षणात गेवराई शहरातून बाहेर काढले.

ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी गेवराईचे आमदार विजयसिंह पंडित आणि माजलगावचे आमदार प्रकाश सोळंके यांच्याबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचे पडसाद बीड जिल्हय़ात उमटले. गेवराईत हाके यांच्या पुतळय़ाला जोडे मारण्यात आले. त्यानंतर लक्ष्मण हाके यांनी मी गेवराईत चहा प्यायला येतोय असे म्हणत आमदार विजयसिंह पंडित यांच्या कार्यकर्त्यांना डिवचले.

आज लक्ष्मण हाके हे गेवराई शहरात आले. छत्रपती शिवाजी महाराज चौकाकडे ते जात असतानाच जमावाने त्यांच्या दिशेने चपला भिरकावल्या, दगडफेक केली. परिस्थिती आवाक्याबाहेर जात असल्याचे पाहून पोलिसांनी दोन्ही गटांच्या कार्यकर्त्यांवर लाठीमार केला. त्यानंतर लक्ष्मण हाके यांना संरक्षणात गेवराई शहराबाहेर पाठवून दिले. या घटनेमुळे शहरात तणाव असून, बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.

Comments are closed.