चंद्रपुरात ओबीसीकडून निषेध आंदोलन, सरकारच्या निर्णयाचा विरोध

राज्यात आरक्षणाचा प्रश्न सोडवण्यात महायुती सरकारला अद्याप यश आलेलं नाही. अशातच राज्य सरकारनं राष्ट्रीय ओबीसी महासंघाशी किंवा ओबीसीतील घटकांशी चर्चा न करता आर्य वैश कोमटी समाजाला ओबीसी मध्ये समावेश करण्याचा निर्णय घेतला आहे. सरकारच्या निर्णयाविरोधात नाराजी व्यक्त करत राष्ट्रीय ओबीसी महासंघाने आंदोलन छेडलं.

राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे महासचिव सचिन राजूरकर यांच्या नेतृत्वात राज्य सरकारच्या विरोधात चंद्रपूर शहरातील जनता कॉलेज चौकात एकत्र येत नारेबाजी करत निषेध केला. आर्य वैश कोमटी समाजाला ओबीसी मध्ये समाविष्ट करून घेण्यासाठी राज्य मागास आयोगाकडून चंद्रपुरात उद्या सुनावणी ठेवण्यात आली आहे. याआधीच चंद्रपुरात ओबीसी कडून सरकारचा निषेध करण्यात आला. आर्य वैश्य समाजाला मागच्या दाराने मागासवर्गीय ठरवून ओबीसी मध्ये टाकण्याचा प्रयत्न कदापि सहन करणार नाही असं राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे महासचिव सचिन राजूरकर यांनी सांगितलं यावेळी शेकडो ओबीसी बांधव आंदोलनात सहभागी झाले होते.

Comments are closed.