लठ्ठपणा ही भारतात एक नवीन साथीचा रोग बनला आहे
भारतात स्थुलत्व आता केवळ आरोग्य समस्या नव्हे, तर सार्वजनिक आरोग्य आणीबाणीच्या स्थितीच्या स्वरुपात समोर येत आहे. 1990 मध्ये देशाच्या प्रौढ लोकसंख्येत स्थुलत्वाचा दर 9-10 टक्के होता, तर 2025 मध्ये हे प्रमाण वाढून 20-23 टक्क्यांपर्यंत पोहोचले आहे. तज्ञांनुसार ही वाढ शहरीकरण, असंतुलित आहार, घटत्या शारीरिक हालचाली आणि वाढत्या तणावाच्या संयुक्त प्रभावाचा परिणाम आहे. जागतिक आरोग्य संघटना आणि इंडियन जर्नल ऑफ मेडिकल रिसर्चनुसार 1990 च्या दशकात भारतात स्थुलत्वाची समस्या मर्यादित होती आणि ग्रामीण क्षेत्रांमध्ये अत्यंत कमी होती. परंतु 2000 नंतर आर्थिक विकासासोबत आहारात बदल, पॅकेज्ड फूड आणि शुगर ड्रिंक्सचे वाढते सेवन आणि जंक फूडच्या प्रसाराने स्थिती बदलली आहे.
4 पैकी एक प्रौढ प्रभावित
2025 पर्यंत देशातील शहरी क्षेत्रांमध्ये प्रत्येक 4 पैकी एक प्रौढ स्थुलत्वाने प्रभावित असल्याचे दिसून आले आहे. या समस्येमागील मुख्य कारण जीवनशैलीचा वाढता दबाव आणि आहाराच्या सवयी आहेत. महानगरे आणि मोठ्या शहरांमध्ये दीर्घ ऑफिस दिनचर्या, घटत्या आउटडोअर हालचाली देखील स्थुलत्वासाठी मोठ्या प्रमाणात जबाबदार आहेत. प्रक्रियाकृत, तेलीय आणि उच्चपॅलरीयुक्त खाद्यपदार्थांचे सेवन तसेच शारीरिक हालचालींमध्ये घट देखील वजन वाढवत आहे.
तेलाचा वापर 5 पट अधिक
इंडियन व्हेजिटेबल ऑइल प्रॉड्यूसर्स असोसिएशननुसार 1990 च्या दशकाच्या प्रारंभी भारतात दरडोई तेलाचा वापर 3.5-4 लिटर प्रतिवर्ष होता, परंतु शहरीकरण, उत्पन्नात वृद्धी आणि पॅकेज्ड तसेच तेलीय भोजनाच्या प्रसारामुळे 2025 पर्यंत हे प्रमाण वाढून 19-20 लिटर प्रतिवर्षावर पोहोचले आहे. म्हणजेच मागील 3 दशकांमध्ये हे प्रमाण 5 पट वाढले आहे. तर जागतिक आरोग्य संघटनेच्या मापदंडांनुसार एका प्रौढासाठी महिन्याला 500-600 मिलिलिटर तेलाचे सेवन पुरेसे आहे. याहून अधिक सेवनामुळे स्थुलत्व, हृदयविकार, उच्च रक्तदाब आणि मधुमेहाचा धोका वाढतो.
Comments are closed.