Childhood Obesity: मुलांचं वाढतं वजन पालकांच्या हातात? जाणून घ्या आहारतज्ज्ञांचा इशारा
आजच्या काळात लहान वयात स्थूलता (Obesity) ही एक गंभीर आरोग्य समस्या बनत चालली आहे. पूर्वी मध्यमवयीन किंवा वयस्क व्यक्तींमध्ये दिसणाऱ्या लठ्ठपणाचं प्रमाण आता लहानग्यांमध्ये झपाट्याने वाढत आहे. आणि या वाढीमागे केवळ मुलांची चूक नसून, त्याला तितक्याच प्रमाणात जबाबदार असतात त्यांच्या घरातले पालक. (obesity in children parenting tips in marathi)
‘ओन्ली मानिनी’ला दिलेल्या मुलाखतीत आहारतज्ज्ञ डॉ. प्रणिता अशोक यांनी स्पष्टपणे सांगितलं की, ‘मुलांना काय खायचं ते ते ठरवत नाहीत, ते आपण पालक ठरवतो. मग त्यांचं आरोग्य बिघडलं, तर जबाबदारीसुद्धा आपलीच असते.’
त्या पुढे म्हणाल्या, ‘पालकांनी त्यांच्या घरात टेबलवर जे ठेवायचं, त्याकडे विशेष लक्ष द्यायला हवं. जर तुम्ही टेबलावर बिस्किटं, चिप्स, मॅगी, शॉर्टकट पाकिटं ठेवत असाल, तर मुलं तेच पाहून, तेच खाणार. त्यांना माहिती नसतं की काय आरोग्यदायक आहे आणि काय नाही. ते फक्त पॅक पाहतात, चव पाहतात आणि लगेच हात लावतात.’
पालकांनी काय करावं?
1) डॉ. प्रणिता यांचा सल्ला
2) टेबलवर फळांची टोपली असू द्या.
3) मखाने भाजून ठेवा, जे पॉपकॉर्नपेक्षा जास्त पौष्टिक आहेत.
4) घरी बनवलेला मुरमुर्याचा चिवडा, पातळ पोह्यांचा चिवडा, तिखट-गोड भडंग ठेवा.
5) फरसाण आणि तळलेले पदार्थ टाळावेत.
6) मुलांबरोबर हेच पदार्थ खावेत, म्हणजे त्यांच्यातही तेच सवयीने येईल.
‘पॅरेंटिंग फक्त प्रेमाने होत नाही, शिस्तही गरजेची असते,’ असंही त्या म्हणाल्या. मुलांच्या आहाराच्या सवयी लहानपणापासून घडतात. त्यामुळे जर सुरुवातीपासून पालक सजग राहिले, तर मुलांचं आरोग्य टिकून राहतं.
मुलांचं आरोग्य त्यांच्या रोजच्या खाण्यावर अवलंबून असतं आणि त्यांच्या रोजच्या खाण्यावर नियंत्रण ठेवणारी पहिली आणि मुख्य व्यक्ती असते आईवडील. त्यामुळे मुलांचं वजन वाढण्याआधीच पालकांनी स्वतःचा आहार तपासावा, त्यांच्यासोबत आरोग्यदायी खाणं सुरू करावं आणि टेबलवरून पॅकेट फूड हटवावं. कारण आरोग्यदायी सवयी लावणं हीच खरी गुंतवणूक आहे.
Comments are closed.