2026 ऐची-नागोया आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये क्रिकेटचा समावेश! ओसीएने केली पुष्टी
ऑलिंपिक कौन्सिल ऑफ एशिया (OCA) ने पुष्टी केली आहे की क्रिकेट 19 सप्टेंबर ते 4 ऑक्टोबर दरम्यान जपानमध्ये होणाऱ्या 2026 च्या आयची-नागोया आशियाई खेळांचा भाग असेल. या आठवड्याच्या सुरुवातीला ऑलिंपिक कौन्सिल ऑफ एशिया आणि आयोजन समिती यांच्यात झालेल्या बैठकीत क्रिकेट कायम ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला.
“क्रीडा कार्यक्रमांच्या यादीतील नवीनतम निर्णय सोमवार, 28 एप्रिल रोजी नागोया सिटी हॉलमध्ये (AINAGOC) संचालक मंडळाच्या 41 व्या बैठकीत घेण्यात आला, ज्यामध्ये क्रिकेट आणि मिश्र मार्शल आर्ट्स दोन्हीला औपचारिक मान्यता देण्यात आली,” असे OCA ने म्हटले आहे.
आयची प्रांतात टी-20 स्वरूपात क्रिकेट सामने खेळवले जातील. तथापि, ठिकाणे अद्याप निश्चित झालेली नाहीत. ओसीएने म्हटले आहे की, “क्रिकेटचे ठिकाण आयची प्रांतात असेल परंतु नेमके ठिकाण अद्याप निश्चित झालेले नाही.
केवळ दक्षिण आशियातील क्रिकेटच्या लोकप्रियतेमुळेच नव्हे तर 2028 मध्ये लॉस एंजेलिस ऑलिंपिकमध्ये टी-20 स्वरूपाचा समावेश केला जाणार असल्याने लोकांना यात रस असेल.
आशियाई क्रीडा स्पर्धेत समाविष्ट असलेल्या 41 स्पर्धांपैकी क्रिकेट हा एक असेल. ओसीएला 45 राष्ट्रीय ऑलिंपिक समित्यांचे प्रतिनिधित्व करणारे 15000 खेळाडू आणि अधिकारी या खेळांमध्ये सहभागी होण्याची अपेक्षा आहे.
आशियाई क्रीडा स्पर्धेत क्रिकेटचा समावेश चौथ्यांदा होणार आहे. यापूर्वी ग्वांगझू, इंचॉन आणि हांग्झो मध्ये त्याचा समावेश करण्यात आला होता. भारतीय पुरुष आणि महिला संघ हे गतविजेते आहेत. 2028 च्या लॉस एंजेलिस ऑलिंपिकमध्येही क्रिकेटचा समावेश असेल
Comments are closed.