उद्यापासून खेळ महोत्सवात योगासने, मल्लखांब, जिम्नॅस्टिक्स स्पर्धांची धम्माल
हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त खासदार अनिल देसाई यांच्या संकल्पनेतून सुरू असलेल्या खेळ महोत्सवात येत्या रविवार, 2 फेब्रुवारीपासून योगासने, मल्लखांब (महिला व पुरुष), जिम्नॅस्टिक्स व अॅक्रोबेटिक्स, पंजा या स्पर्धांची धम्माल दक्षिण मध्य मुंबईत विविध ठिकाणी पाहायला मिळणार आहे. 15 जानेवारीपासून सुरू असलेला खेळ महोत्सव 16 फेब्रुवारीपर्यंत रंगणार आहे.
खेळ महोत्सवादरम्यान आता योगासने, मल्लखांब, जिम्नॅस्टिक्स व अॅक्रोबेटिक्स या स्पर्धा चेंबूरच्या वाशी नाका येथील गोपीनाथ मुंडे स्पोर्ट्स मैदानात रंगणार असून पंजा लढवण्याची स्पर्धा धारावी क्रीडा संपुलात खेळविली जाणार आहे. या स्पर्धांमध्ये लाखमोलांची बक्षिसेही विजेत्यांना दिली जाणार आहेत. या स्पर्धांमध्ये 800 पेक्षा अधिक खेळाडूंनी सहभाग घेतला असल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे. पारंपरिक आणि कलात्मक खेळांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशानेच या खेळ महोत्सवाचे आयोजन केल्याची भावना खासदार अनिल देसाई यांनी बोलून दाखवली.
Comments are closed.