आजपासून रेल्वे तिकिटापासून ऑनलाइन पेमेन्टपर्यंत होणार ‘हे’ मोठे बदल, सर्वसामान्यांच्या खिशावर ह


1 ऑक्टोबरपासून नियम बदलतात: नवीन महिना म्हणजे अनेक नवे नियम, नवे बदल आणि त्याचा थेट परिणाम सर्वसामान्यांवर होणार. यंदा ऑक्टोबर महिना सुरू होताच तुमच्या दैनंदिन जीवनाशी निगडित अनेक नियम बदलणार आहेत. (1st October) हे बदल फक्त तांत्रिक किंवा कागदी स्वरूपाचे नाहीत, तर त्यांचा थेट परिणाम घरगुती बजेट, खरेदी-विक्री, प्रवास, व्यवहार आणि अगदी मनोरंजनाच्या पद्धतींवर होणार आहे. रेल्वे प्रवासापासून पेन्शन गुंतवणुकीपर्यंत, डिजिटल पेमेंटपासून ऑनलाईन गेमिंगपर्यंत अनेक क्षेत्रात हे नियम लागू होणार आहेत. त्यामुळे 1 ऑक्टोबरपासून सुरू होणारे नवे बदल काय आहेत, ते एक एक करून जाणून घेऊयात.

रेल्वे तिकीट बुकिंगमध्ये बदल

आतापर्यंत, एजंट आणि दलाल IRCTC तिकीट बुकिंगच्या पहिल्या काही मिनिटांत मोठ्या प्रमाणात तिकिटे बुक होते. यामुळे सामान्य प्रवाशांना तिकीट मिळत नव्हते. पण आता 1 ऑक्टोबरपासून, IRCTC वरून तिकीट बुक करताना सुरूवातीचे 15 मिनिटे आता एजंट तिकीट बुक करू शकणार नाही. त्यामुळे सर्वसामान्य प्रवाशांना तिकीट मिळेल.

पेन्शन योजनेत बदल

नॅशनल पेन्शन सिस्टीम (एनपीएस) मध्ये एक नवीन मल्टीपल स्कीम फ्रेमवर्क लागू केले जाईल. यामुळे बिगर सरकारी क्षेत्रातील कर्मचारी, कॉर्पोरेट व्यावसायिक आणि गिग कामगार एकाच पॅन नंबरचा वापर करून अनेक पेन्शन योजनांमध्ये गुंतवणूक करू शकतील. यामुळे गुंतवणूकदारांना त्यांच्या सोयी आणि जोखीम घेण्याच्या क्षमतेनुसार सर्वोत्तम पर्याय निवडता येईल.

डिजिटल पेमेंटमध्ये बदल

आता सर्वच जण UPI (Google Pay, PhonePe, Paytm) वापरून डिजिटल पेमेंट करतात. आता, NPCI ने एक मोठा बदल केला आहे. १ ऑक्टोबरपासून NPCI ने UPI चे “रिक्वेस्ट फॉर मनी” फीचर बंद करण्याचा निर्णय घेतलाय… या फीचरचा वापर कोणीही तुम्हाला पेमेंट रिक्वेस्ट पाठवण्यासाठी करू शकतो. याचा अनेकदा फसवणूक आणि फिशिंगसाठी गैरवापर केला जात असे. आता ते बंद झाल्यामुळे, डिजिटल व्यवहार आणखी सुरक्षित होतील. गुगल पे आणि फोनपे सारख्या अ‍ॅप्सद्वारे पैसे मागण्यासाठी ही सुविधा आता उपलब्ध राहणार नाही.

ऑनलाईन गेमिंगमध्ये बदल

ऑनलाइन गेमिंग क्षेत्र वेगाने वाढत आहे. परंतु त्यासोबत फसवणुकीच्या घटनाही घडत आहेत. सरकारने मंजूर केलेले नवीन नियम १ ऑक्टोबरपासून लागू होतील. गेमिंग कंपन्यांवर सरकारकडून कडक नजर ठेवली जाईल. खेळाडूंना सुरक्षित वातावरण आणि पारदर्शक प्रणाली मिळेल. फसवणूक आणि बनावट अॅप्सवर बंदी घातली जाईल. यामुळे गेमिंग उद्योगाचे नियमन होईल आणि खेळाडूंचा आत्मविश्वास वाढेल.

आणखी वाचा

Comments are closed.