‘बाहेर काहीही असो रोहित-विराटशी माझं नातं..’, जाणून घ्या शुबमन गिल नेमकं काय म्हणाला?
भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यात रविवार, 19 ऑक्टोबरपासून 3 सामन्यांची वनडे मालिका सुरू होणार आहे. या मालिकेत शुबमन गिल वनडे संघाचा कर्णधार म्हणून पदार्पण करणार आहे. पहिल्या वनडे सामन्याआधी नवा कर्णधार शुबमन गिलने माजी कर्णधार आणि सीनियर फलंदाज रोहित शर्मा व विराट कोहलीशी नात्याबद्दल मोठा खुलासा केला आहे.
मात्र, मागील काही दिवसांपासून सोशल मीडियावर चर्चा चालू होती की शुबमन गिलचे विराट कोहली आणि रोहित शर्माशी संबंध खराब झाले आहेत, आणि दोघेही नव्या कर्णधाराशी बोलत नाहीत. यावर गिलने प्रतिक्रिया दिली. त्याने सांगितले की, रोहित शर्मा आणि विराट कोहलीशी त्यांचे संबंध अगदी आधीप्रमाणे मजबूत आहेत, आणि सामना दरम्यान काही अडचण आली, तरी त्यांना या दोघांकडून सल्ला घेण्यास काहीही अडचण नाही.
स्वान नदीच्या किनाऱ्यावर झालेल्या प्रेस कॉन्फरन्समध्ये शुबमन गिल म्हणाले, बाहेर काहीही बोललं जात असलं, तरी रोहित शर्मा सोबत माझे संबंध बदललेले नाहीत. जेव्हा मला मदतीची गरज असते, तेव्हा तो नेहमी उपलब्ध असतो. खेळपट्टी बाबत माहिती हवी असेल किंवा काहीही, मी त्याच्याकडे जाऊन विचारतो की तुझ्या मते काय करावे. विराट आणि रोहित सोबत माझे खूप चांगले संबंध आहेत आणि ते सल्ला देण्यास कधीच मागेपुढे राहत नाहीत.
26 वर्षांच्या शुबमन गिलला माहित आहे की, या दोन्ही दिग्गजांची जागा घेणे सोपे नाही आणि त्याला दोन्ही माजी कर्णधारांकडून भरपूर सहकार्य मिळेल.
त्याने सांगितले,
मी विराट आणि रोहितसोबत संघाला पुढे कसे न्यायचे याबद्दल खूप चर्चा केली आहे. त्यांनी टीम कशी पुढे नेली आणि त्यांचा अनुभव आणि शिकवण आम्हाला खूप मदत करेल. माही भाई (एमएस धोनी), विराट भाई आणि रोहित भाई यांनी जी पारंपरिक टीम तयार केली, तिचा अनुभव आणि शिकवण फार मोठा आहे. त्यांच्या अनुभवामुळे आणि कौशल्यामुळे टीमला फार फायदा होईल.”
त्याने पुढे सांगितले,
जेव्हा मी छोटा होतो, तेव्हा हे माझे आदर्श खेळाडू होते. ते जसे खेळले आणि जशी त्यांना धावांची भूक होती, त्यातून मला खूप प्रेरणा मिळाली. अशा महान खेळाडू असलेल्या संघाचे कर्णधार होणे माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. जेव्हा कधीही मला अडचण येईल, मी त्यांच्याकडून सल्ला घेण्यास मागेपुढे होणार नाही. त्यांच्या नेतृत्वाखाली खेळून मी खूप काही शिकलो आहे. मी असा कर्णधार बनू इच्छितो जिथे माझे सर्व खेळाडू सुरक्षित आणि स्पष्ट संवादासह राहतील.
या दोघांनी जवळपास 20 वर्ष भारतीय क्रिकेटसाठी सेवा केली आहे आणि मी त्यांच्याकडून खूप काही शिकलो आहे. त्यांच्या अनुभवाची तुलना करता येणार नाही. त्यांनी संपूर्ण जगभरात धावा केल्या आहेत.
Comments are closed.