अन्न व सुरक्षा अधिकाऱ्यांना ताज लँडस् एंडमध्ये ट्रेनिंग? रोहित पवार यांनी उपस्थित केले प्रश्न

अन्न व सुरक्षा विभागाचे काही अधिकारी ताज लँडस् एंड या पंचतारांकित हॉटेलमध्ये पार्टी करत असल्याचे एका व्हिडीओमध्ये दिसत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी हा व्हिडीओ ‘एक्स’वरून शेअर करत नियमानुसार शासकीय प्रशिक्षण झालेले असताना ताज लँडस् एंडमध्ये त्यांना कोणते नवीन ट्रेनिंग देण्यात आले? असा सवाल केला आहे.
अन्न व सुरक्षा विभागाच्या काही अधिकाऱ्यांचा ताज लँडस् एंड हॉटेलमधील पार्टीच्या व्हिडीओवर रोहित पवार यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. हा व्हिडीओ कुणा खासगी कंपनीतील कर्मचाऱ्यांच्या पार्टीचा नाही, तर तो आहे एमपीएससीकडून नियुक्त झालेल्या नवनियुक्त अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांचा. या अधिकाऱ्यांचे नियमानुसार शासकीय प्रशिक्षण झालेले असतानाही मुंबईतील ताज लँडस् एंड या हॉटेलमध्ये त्यांना कोणते नवीन ट्रेनिंग देण्यात आले? हे प्रशिक्षण आयुक्त अन्न सुरक्षा यांनी आयोजित केले होते का? त्यांनी नसेल तर कुणी आयोजित केले? हॉटेलचे बिल कुणी दिले? की एफडीएचे अधिकारी म्हणून धमकावून फुकटात वेलकम पार्टीचा आनंद लुटला? असे प्रश्न रोहित पवार यांनी केले आहेत.
एफडीएचे मंत्री निलंबनाची कारवाई करणार च्या?
एक गाणे म्हटले म्हणून एका तहसीलदाराचे निलंबन केले जात असेल तर मग इथेही महाराष्ट्र नागरी सेवा अधिनियम 1979 (वर्तवणूक) नुसार या अधिकाऱ्यांवरही कारवाई होणार का? एफडीएचे मंत्री निलंबनाची कारवाई करणार का? या नियुक्त्यांमध्ये काही काळंबेरे झाले का? या सर्व प्रश्नांची उत्तरे या विभागाचे मंत्री महोदय देणार का? अशी विचारणा रोहित पवार यांनी केली आहे.
Comments are closed.