रशियाकडून तेल खरेदी सुरुच ठेवणार, ट्रम्प टॅरिफ लागू होऊनही ONGC चं मोठं वक्तव्य

तेल आणि नैसर्गिक गॅस कॉर्पोरेशन नवी दिल्ली: अमेरिकेनं भारतावर ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला 25 टक्के टॅरिफ लादलं होतं. त्या टॅरिफमध्ये 25 टक्क्यांची वाढ करुन ते 50 टक्के केलं आहे. भारतीय वस्तूंच्या आयातीवर अमेरिकेनं 50 टक्के टॅरिफ लादलं आहे. त्याची अंमलबजावणी 27 ऑगस्टपासून सुरु करण्यात आली आहे. भारतातील सरकारी कंपनी ऑईल अँड नॅच्युरल गॅस कॉर्पोरेशननं शुक्रवारी रशियाकडून तेल खरेदी करणं सुरु ठेवू असं म्हटलं आहे. जोपर्यंत व्यापारीदृष्ट्या  हे योग्य असेल तोपर्यंत तेल खरेदी सुरु ठेवणार असं ओएनजीसीनं म्हटलं आहे.

ONGC चे चेअरमन अरुण कुमार सिंह यांनी म्हटलं की आतापर्यंत रशियाकडून होणाऱ्या तेल खरेदीवर कोणतेही निर्बंध नाहीत. जोपर्यंत सरकार इतर कोणता निर्णय घेत नाही तोपर्यंत आम्ही तेल खरेदी सुरु ठेवू, असं अरुण कुमार सिंह म्हणाले. ओएनजीसीला योग्य दरामध्ये ऊर्जा साधनं मिळत असतील तर विदेशात देखील त्याचं अधिग्रहण करण्यावर विचार करणार असल्याचं ते म्हणाले.

ONGCचे 21 प्रकल्प सुरु

ओएनजीसीचे दोन यूनिट हिंदूस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड आणि मंगळुरु रिफायनरी अँड पेट्रोकेमिकेल्स त्यांच्या रिफायनरीसाठी नियमितपणे रशियाकडून तेल खरेदी करते. कंपनीनं चालू आर्थिक वर्षात देशांतर्गत उत्पादन वाढवण्यासाठी नियोजन केलं आहे. सध्या ओएनजीसीचे 21 प्रकल्प सुरु आहे. ज्याचा खर्च 66000 कोटी रुपये आहे. यातील 9 विकासाचे प्रकल्प आहेत. तर, इतर प्रकल्प इन्फ्रास्ट्रक्चरशी संबंधित प्रकल्प आहेत.

कंपनीकडून गुंतवणुकीच्या संधीचा शोध

ओएनजीसीचे विदेशचे व्यवस्थापकीय संचालक राजर्षी गुप्ता यांनी पहिल्यांदा म्हटलं होत की कंपनी अमेरिकेत एलएनजी आणिअपसट्रीम संपत्तीमध्ये गुंतवणुकीचा विचार करत आहे. कंपनी लॅटिन अमेरिका, आफ्रिका आणि पश्चिम आशियासह इतर दुसऱ्या देशांमध्ये ग्रीनफील्ड आणि ब्राऊनफील्ड संपत्तीचा शोध घेत आहे. लॅटिन अमेरिका आणि आफ्रिकेचं नाव घेत ते म्हणाले की आम्ही अमेरिकेत उपयुक्त संपत्तीचा शोध घेत आहे. रशियात आमचे तीन प्रकल्प सुरु आहेत. इतर भौगोलिक क्षेत्रांचा विचार करत आहोत. खनिजानं समृद्ध असल्यानं त्या देशांमध्ये तेलसाठे सापडण्याची शक्यता आहे. भविष्यकाळात कच्च्या तेलाच्या किमती  60 डॉलर प्रति बॅरलच्यादरम्यान राहतील, असं ते म्हणाले.

यूक्रेन युद्धापासून भारताची रशियाकडून तेल खरेदी वाढली

भारत आणि चीन हे दोन्ही देश रशियाच्या तेलाचे मोठे खरेदीदार आहेत. रशिया आणि यूक्रेन यांच्यातील युद्ध सुरु झाल्यानंतर भारतानं रशियाकडून तेल खरेदी वाढवली आहे. वाणिज्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार 2018 मध्ये भारत रशियाकडून 1.3 टक्के तेल खरेदी करत होता. 2024-25 मध्ये तेलाची खरेदी 35 टक्क्यांवर पोहोचली आहे.

हेदेखील वाचा

आणखी वाचा

Comments are closed.