पाकिस्तान क्रिकेट लिग PSL ला इंधन टंचाईचा फटका; ‘Petrol Shortage League’ म्हणत चाहत्यांनी उडवली खिल्ली
पाकिस्तानातील टी-२० लीग, ‘पाकिस्तान सुपर लीग’ ला आता मैदानाबाहेर पडून ‘इनडोअर’ खेळावे लागत आहे. इंधनाच्या तुटवड्यामुळे जनरेटर चालवणे आणि प्रकाशझोतांची व्यवस्था करणे अशक्य झाल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, या निर्णयामुळे सोशल मीडियावर चाहत्यांनी पीएसएलला चांगलेच धारेवर धरले आहे. जगभरात आता पाकिस्तानच्या क्रिकेट लीगला Petrol Shortage League म्हणत त्याची खिल्ली उडवली जात आहेत.
‘पाकिस्तान सुपर लीग’ ला स्टेडियममधील अवाढव्य खर्च आणि इंधनाची कमतरता पाहता, उरलेले सामने लहान इनडोअर संकुलात हलवण्यात आले आहेत. तसेच हे सामने सहा शहरांऐवजी आता दोन शहरांमध्येच खेळवले जाणार आहे. तसेच मोठ्या मैदानांवरील रोषणाई आणि प्रेक्षकांच्या उत्साहाविना होणाऱ्या या सामन्यांमुळे पाकिस्तानातील क्रिकेटप्रेमी नाराज झाले आहेत.सोशल मीडियावर ‘PSL’ चा नवा फुलफॉर्म ‘Petrol Shortage League’ असा करून नेटकऱ्यांनी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाची (PCB) खिल्ली उडवली आहे.
इंधन संकटाचे सावट
होर्मुझच्या सामुद्रधुनीतील तणावामुळे आणि इराणने लादलेल्या अतिरिक्त शुल्कामुळे पाकिस्तानला तेल आयात करणे कठीण झाले आहे. याचा थेट परिणाम देशातील वीज पुरवठा आणि वाहतुकीवर झाला असून, आता त्याचा फटका थेट खेळाला बसला आहे.
Comments are closed.