करदात्यांसाठी महत्त्वाची अपडेट, जुनी कररचना एक दोन वर्षात संपेल, वित्त सचिवांचं मोठं वक्तव्य

जुने कर व्यवस्था नवी दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) यांनी 1 फेब्रुवारीला अर्थसंकल्प सादर केला. निर्मला सीतारामन यांनी मध्यमवर्गाला दिलासा देणारी घोषणा केली. नव्या कररचनेचे (New Tax Regime) स्लॅब बदलण्यात आले. करमुक्त उत्पन्न  नव्या कर रचनेत तीन लाखांवरुन चार लाखांवर नेण्यात आली. प्राप्तिकराच्या टक्केवारीत देखील बदल करण्यात आले. याशिवाय 12 लाख रुपयांच्या उत्पन्नापर्यंत प्राप्तिकरदात्यांना करसवलत देण्यात आली आहे. या अर्थसंकल्पात जुन्या कररचनेसंदर्भात (Old Tax Regime) कोणताही उल्लेख करण्यात आलेला नाही. वित्त व महसूल विभागाचे सचिव तुहिन कांत पांडेय यांनी जुन्या कररचनेसंदर्भात मोठं वक्तव्य केलं आहे. जुनी कररचना येत्या एक दोन वर्षात संपेल, असं ते म्हणाले.

तुहिन कांत पांडेय जुन्या कररचनेबाबत काय म्हणाले?

तुहिन कांत पांडेय म्हणाले नव्या कररचनेत करसवलत 12 लाख रुपयांपर्यंत दिली जाणार आहे. त्यामुळं जुनी कररचना आपोआप संपेल, अशी शक्यता आहे. आम्ही नवी करव्यवस्था आणली आहे, याचा उद्देश हा आहे की  तुम्ही करातून सूट मिळवण्याबाबत कायम विचार करण्यापूर्वी आपल्या गरजेनुसार गुंतवणुकीचा विचार करावा.

जुनी कररचना टप्प्या टप्प्यानं संपेल का असं विचारलं असता त्यांनी अर्थसंकल्पात जुन्या कररचनेसंदर्भात कोणताही उल्लेख करण्यात आलेला नाही. त्यामध्ये सूट आणि स्लॅबचे दर वेगवेगळे आहेत.  मात्र, माझ्या मते जुनी कररचना आपोआप संपुष्टात येईल. 2025-26 च्या अर्थसंकल्पात एवढ्या मोठ्या प्रमाणात सूट देण्यात आली आहे. त्यामुळं सर्व करदाते नव्या कररचनेत येतील. जर, तुम्हाला 12 लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर करसवलत हवी असेल तर तुम्ही काय कराल, असं तुहिन कांत पांडेय म्हणाले.

सर्व लोक नव्या कररचनेत आल्यानंतर जुनी करव्यवस्था आपोआप संपुष्टात येईल. याशिवाय नवी कररचना डिफॉल्ट आहे. जर तुम्ही जुनी कररचना निवडली नाही तर नवी कररचना आपोआप निवडली जाते.

तुहिन कांत पांडेय यांनी नवा प्राप्तिकर कायदा छोटा आणि सरळ असेल. समजून घेण्यासाठी सोपा असेल. जुन्या झालेल्या गोष्टी हटवल्या जातील. सर्व गोष्टी एका ठिकाणी आणल्या जातील, यामुळे कायदेशीवरा वाद कमी होतील, असं तुहिन कांत पांडेय म्हणाले.

दरम्यान, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 75 टक्के लोकांनी नव्या कररचनेचा पर्याय स्वीकारल्याची माहिती दिली होती. जुन्या कररचनेत 25 टक्के करदाते आहेत. ते लवकरच नव्या कररचनेत येतील, अशी आशा सीतारामन यांनी व्यक्त केली होती.

इतर बातम्या:

अधिक पाहा..

Comments are closed.