कलाम : द मिसाईल मॅन, ओम राऊत यांनी केली कलाम यांच्या बायोपिकची घोषणा, ‘हा’ अभिनेता साकारणार मुख्य भूमिका

‘हिंदुस्थानचे मिसाइल मॅन’ म्हणून ओळखले जाणारे व देशाचे माजी राष्ट्रपती दिवंगत डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्यावर बायोपिक येणार आहे. बॉलीवूडचे प्रसिद्ध दिग्दर्शक ओम राऊत यांनी कलाम यांच्या जीवनावर आधारित चित्रपट काढणार असल्याची घोषणा केली आहे. कान्स चित्रपट महोत्सवात या चित्रपटाची घोषणा करण्यात आली असून या चित्रपटाचे पोस्टरही शेअर करण्यात आले आहे. या चित्रपटात कलाम यांच्या भूमिकेत प्रसिद्ध तमिळ अभिनेत धनुष दिसणार आहे.

ओम राऊत यांनी इंस्टाग्रामवरून या चित्रपटाचे पोस्टर शेअर केले आहे. यासोबत त्यांनी ‘रामेश्वरम ते राष्ट्रपती भवन… एका लिजेंडचा प्रवास सुरू. हिंदुस्थानचे मिसाईल मॅन येतायत आता रुपेरी पडद्यावर”, अशी पोस्ट शेअर केली आहे.

Comments are closed.