शुक्रवारी सेन्सेक्स 367 अंकांच्या घसरणीसह बंद झाला.

आयटी, ऑटो समभाग घसरणीत : टायटन समभाग चमकला

वृत्तसंस्था/ मुंबई

शुक्रवारी आठवड्याच्या शेवटच्या दिवशी भारतीय शेअरबाजारात दबाव पहायला मिळाला. सेन्सेक्स 367 अंकांनी घसरत बंद झाला. सेन्सेक्समध्ये 30 पैकी 24 समभागांमध्ये दबाव पाहायला मिळाला. तर निफ्टीत 50 पैकी 35 समभाग घसरणीसोबत बंद झाले.

शुक्रवारी सरतेशेवटी मुंबई शेअरबाजाराचा 30 समभागांचा सेन्सेक्स निर्देशांक 367 अंकांनी घसरत 85041 अंकांवर बंद झाला तर दुसरीकडे राष्ट्रीय शेअर बाजाराचा 50 समभागांचा निफ्टी निर्देशांक 99 अंकांनी घसरत 26042 अंकांवर बंद झाला. बँक निफ्टी निर्देशांक 172 अंकांच्या नुकसानीसह 59011 च्या स्तरावर बंद झाला. मिडकॅप समभागांमध्ये दबाव शुक्रवारी दिसून आला असून स्मॉलकॅप निर्देशांक सपाट स्तरावर बंद झाला. विविध क्षेत्राच्या निर्देशांकात मेटल, पीएसई यांचे निर्देशांक तेजीसोबत बंद झाले तर आयटी, ऑटो, फार्मा निर्देशांक घसरणीसोबत बंद झाले होते. कमोडिटीज, एफएमसीजी यांचे निर्देशांक तेजीत होते तर फायनॅन्शीयल, एनर्जी, इन्फ्रा, रिअल्टी, ऑईल अँड गॅस यांचे निर्देशांक नुकसानीसह बंद झाले.

समभागांची कामगिरी

शुक्रवारी निफ्टीत पाहता टायटन, नेस्ले इंडिया, हिंडाल्को, सिप्ला, एनटीपीसी व ओएनजीसी यांचे समभाग तेजीत होते. यासोबत अदानी एंटरप्रायझेस, अल्ट्राटेक सिमेंट, एचयुएल, रिलायन्स, जेएसडब्ल्यू स्टील, कोटक महिंद्रा बँक व आयशर मोटर्स यांचेही समभाग नफ्यासह बंद झाले. घसरणीत एशियन पेंटस्, श्रीराम फायनान्स, टेक महिंद्रा, टीसीएस, बजाज फायनान्स व बजाज ऑटो यांचे समभाग समाविष्ट होते. तसेच ग्रासिम, एसबीआय लाइफ, एल अँड टी, बीईल, इन्फोसिस, आयटीसी, इटर्नल, आयसीआयसीआय बँक, मारुती सुझुकी, जियो फायनॅन्शीयल्स, मॅक्स हेल्थकेअर, विप्रो, सनफार्मा, एसबीआय, टाटा मोटर्स पीव्ही, ट्रेंट, कोल इंडिया यांचे समभागही दबावात बंद झाले होते. मिडकॅप निर्देशांकात हुडको, आरव्हीएनएल, काँकर यांचे समभाग तेजीत होते.

Comments are closed.