बुधवारी शेअर बाजार काहीशा घसरणीसह बंद झाला.

सेन्सेक्स 116 अंकांनी घसरला : आयटी, फार्मा समभाग कमकुवत

मुंबई :

तीन सत्रांच्या तेजीनंतर बुधवारी मात्र भारतीय शेअर बाजार अल्पशा घसरणीसह बंद झाला. मंगळवारच्या सत्रात निफ्टी तेजीसह बंद झाला होता. ख्रिसमसच्या पूर्वसंध्येला बाजारात घसरण राहिली असून आयटी व फार्मा समभागांच्या खराब कामगिरीचा परिणाम बाजारात दिसला. बुधवारी सरतेशेवटी मुंबई शेअरबाजाराचा 30 समभागांचा सेन्सेक्स निर्देशांक 116 अंकांनी घसरत 85408 अंकांवर बंद झाला होता तर दुसरीकडे राष्ट्रीय शेअर बाजाराचा 50 समभागांचा निफ्टी निर्देशांक 35 अंकांनी घसरणीसोबत 26142 च्या स्तरावर बंद झाला. निफ्टी बँक निर्देशांक 115 अंकांनी कमकुवत होत 59183 अंकांवर बंद झाला. सेन्सेक्समधील 30 समभागांपैकी 18 समभागांमध्ये दबाव होता तर निफ्टीतील 50 पैकी 27 समभागांमध्ये घसरण राहिली होती.

क्षेत्राच्या निर्देशांकाचा विचार करता मेटल, रियल्टी निर्देशांक तेजीत होते. आयटी, फार्मा, एफएमसीजी, एनर्जी, पीएसई निर्देशांक दबावात बंद झाला.  मिडकॅप 100 निर्देशांक 365 अंकांनी घसरत 60451 च्या स्तरावर कार्यरत होता. ऑईल व गॅस हा निर्देशांकही मोठ्या प्रमाणात घसरणीत होता. यातील एमजीएल व इंडियन ऑईल यांचे समभाग सर्वाधिक नुकसानीत होते. मेटल निर्देशांकाने सलग 6 व्या सत्रात तेजी राखली आहे. ऑटो निर्देशांकाची तीन दिवसांनंतर तेजी थांबली आहे.

हे समभाग तेजीत

बुधवारी शेअरबाजारात पाहता ट्रेंट, कोल इंडिया, श्रीराम फायनान्स, इटर्नल, एचडीएफसी बँक, मॅक्स हेल्थकेअर, अदानी पोर्टस्, अपोलो हॉस्पिटल, आयशर मोटर्स, कोटक महिंद्रा बँक, पॉवरग्रिड कॉर्प, बजाज ऑटो, अॅक्सिस बँक, भारती एअरटेल, टीसीएस, महिंद्रा आणि महिंद्रा, अल्ट्राटेक सिमेंट, हिंडाल्को, एसबीआय लाइफ, मारुती सुझुकी, जियो फायनॅन्शीयल्स व नेस्ले इंडिया यांचे समभाग तेजी राखत बंद झाले होते.

हे समभाग घसरणीत

दुसरीकडे घसरणीत ग्रासिम, लार्सन टुब्रो, टेक महिंद्रा, इन्फोसिस, सिप्ला, जेएसडब्ल्यू स्टील, हिंदुस्थान युनिलिव्हर, डॉ. रे•िज लॅब्ज, टाटा कंझ्युमर, टाटा मोटर्स पीव्ही, एसबीआय, आयटीसी, एनटीपीसी, ओएनजीसी, एचडीएफसी लाइफ, बजाज फिनसर्व्ह, एशियन पेंटस्, टायटन, टाटा स्टील, आयसीआयसीआय बँक, रिलायन्स इंडस्ट्रिज, विप्रो व अदानी एंटरप्रायझेस यांचा समावेश होता.

Comments are closed.