पोलिसाला मारहाणप्रकरणी एकाला अटक

पवई येथे फेरीवाल्याने पोलिसाला मारहाण केल्याची घटना ताजी असतानाच बोरिवली येथे पोलिसाला मारहाण केल्याची घटना घडली. मारहाणप्रकरणी गौरव शेलार याला बोरिवली पोलिसांनी अटक केली. पळून गेलेल्या तिघांचा पोलीस शोध घेत आहेत.
बोरिवली पोलीस ठाण्यात ते काम करतात. बुधवारी रात्री ते गस्त घालत होते तेव्हा बाभई नाका येथे गौरव हा त्याच्या सहकाऱयासोबत दारूच्या नशेत गोंधळ घालत होता. त्यांनी त्याला घरी जाण्यास सांगितले. त्याचा राग आल्याने त्या चौघांनी त्यांना शिवीगाळ करून मारहाण केली. मारहाणीत त्यांच्या पोटाला, हाताला दुखापत झाली आहे. या घटनेची माहिती समजताच बोरिवली पोलीस घटनास्थळी आले. सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी पोलिसांनी चौघांविरोधात गुन्हा नोंद केला. गुन्हा दाखल होताच पोलिसांनी गौरवला अटक केली. त्याला अटक करून न्यायालयात हजर केले.
Comments are closed.