माजी नगरसेवकाची सोनसाखळी चोरीचा प्रयत्न

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

चोरटय़ाने माजी नगरसेवकाची सोनसाखळी चोरण्याचा प्रयत्न केल्याची घटना बोरिवली पूर्व येथे घडली. या प्रकरणी कस्तुरबा मार्ग पोलिसांनी एकाला ताब्यात घेतले आहे.

तक्रारदार हे माजी नगरसेवक आहेत. रविवारी रात्री ते कारने बोरिवली पूर्व परिसरात जात होते. रहदारी जास्त असल्याने त्याची कार थांबली होती. तेव्हा एक जण त्यांच्या कारजवळ आला. हॉर्न वाजल्यानंतर तो बाजूला हटत नव्हता. त्याला समजवण्यासाठी तक्रारदार हे कारमधून खाली उतरले. एकाने त्यांची गळ्यातील सोनसाखळी खेचण्याचा प्रयत्न केला. तक्रारदार यांनी आरडाओरड केला. चोरटय़ाने तक्रारदार यांना धक्का मारून खाली पाडले.

त्यात तक्रारदार यांच्या बोटाला आणि कोपराला दुखापत झाली. त्यानंतर स्थानिक नागरिक जमा झाले. नागरिकांनी चोरटय़ाचा पाठलाग करून त्याला पकडले. त्याला पुढील कारवाईसाठी कस्तुरबा मार्ग पोलिसांच्या स्वाधीन केले. कस्तुरबा मार्ग पोलिसांनी त्यांच्या विरोधात गुन्हा नोंद केला.

Comments are closed.