सहा चेंडू, सहा षटकार! श्रीलंकेच्या थिसारा‌ परेराने मैदानात केली‌ गोलंदाजांची धुलाई

एशियन लीजेंड्स लीगच्या एलिमिनेटर सामन्यात श्रीलंकन लायन्स संघाने अफगाणिस्तान पठाण संघाला 26 धावांनी पराभूत केले. श्रीलंकन लायन्स संघाचा खेळाडू थिसारा परेराने या सामन्यात शतकांच रेकॉर्ड ठोकलं. त्याने 36 चेंडूत नाबाद 108 धावांची शानदार पारी खेळली. या पारिच्या मदतीने संघाने 230 धावांचं मोठं आव्हान उभं केलं. त्यानंतर धावांचा पाठलाग करताना अफगाणिस्तानने सुद्धा चांगली फलंदाजी केली पण हा संघ फक्त 204 धावा करू शकला.

पहिल्यांदा फलंदाजी करताना श्रीलंकन लायन्स संघाची तिसरी विकेट पडली. तेव्हा त्यांचा स्कोर 9.4 षटकात 75 धावा इतका होता. यानंतर मेवन फर्नांडोने थिसारा सोबत 155 धावांची भागीदारी रचली. कर्णधार परेराने 36 चेंडूत 108 धावा केल्या.

परेराच्या या तुफानी पारीमध्ये त्याने एकूण 13 षटकार आणि 2 चौकार मारले. त्याने आयान खान द्वारे टाकलेल्या 20व्या षटकात 6 षटकार ठोकले. या षटकाचा पहिला चेंडू वाईड होता. त्यानंतर परेराने सलग 3 षटकार ठोकले. दबावामध्ये आलेल्या खानने एक वाईड चेंडू टाकला. यानंतर परिराने पुन्हा एक षटकार मारला. त्याने पुन्हा एक वाईड चेंडू टाकला आणि शेवटच्या दोन चेंडू मध्ये पुन्हा परेराने सलग दोन षटकार मारून या षटकात सहा षटकार मारले.

मेवन फर्नांडोने सुद्धा परेराला खूप साथ दिली. त्याने 81 धावांची नाबाद पारी खेळली. 56 चेंडूमध्ये त्याने 7 चौकार आणि 3 षटकार लावले.

श्रीलंकन लायन्स संघाने 230 धावांच मोठं आव्हान उभं केलं. धावांचा पाठलाग करताना अफगाणिस्तान 204 च धावा करू शकला. अफगाणिस्तानचा कर्णधार असगर अफगाणने सर्वाधिक 70 धावांची पारी खेळली. त्याने 31 चेंडूत 70 धावा केल्या होत्या, त्यामध्ये त्याने 8 षटकार लावले. त्यानंतर श्रीलंकन लायन्स संघ एलिमिनेटर सामना जिंकून क्वालिफायर 2 मध्ये पोहोचला आहे. क्वालिफायर 2 पूर्वी आज क्वालिफायर 1 सामना असेल. यामध्ये इंडियन रॉयल्स आणि एशियन स्टार्स संघ समोरासमोर असतील. उदयपूरच्या मिराज इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियम वर हा सामना संध्याकाळी 7 वाजता सुरू होणार आहे.

Comments are closed.