अर्शदीप एका खेळीत दोन मोठ्या कामगिरी करणार? रऊफचा विक्रम मोडत भारतीय क्रिकेटचा इतिहास बदलणार!

आशिया कपचा (Asia Cup 2025) 17वा हंगाम 9 सप्टेंबरपासून सुरू होत आहे. भारतीय संघ आपला पहिला सामना 10 सप्टेंबर 2025 रोजी संयुक्त अरब अमिराती (UAE) विरुद्ध खेळणार आहे. या सामन्यात जर अर्शदीप सिंहने (Arshdeep Singh) एक विकेट घेतली, तर तो दोन मोठ्या टप्प्यांवर पोहोचेल.

अर्शदीप टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारताकडून 100 विकेट घेणारा पहिला खेळाडू ठरेल. तसेच तो सर्वात कमी सामन्यांत 100 विकेट घेणाऱ्या खेळाडूंमध्ये जगातील चौथा खेळाडू ठरेल.

सध्या हा विक्रम पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज हारिस रऊफच्या (Haris Rauf) नावावर आहे. त्याने 71 सामन्यांत 100 विकेट घेतल्या आहेत. अर्शदीपने 63 सामन्यांत 99 विकेट घेतल्या आहेत. म्हणजेच पुढच्या सामन्यात फक्त एक विकेट घेताच तो रऊफला मागे टाकेल आणि ही मोठी कामगिरी आपल्या नावावर करेल.

टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात वेगाने 100 विकेट घेण्याचा विक्रम अफगाणिस्तानच्या राशिद खानकडे (Rashid Khan) आहे. त्याने फक्त 53 सामन्यांत हा टप्पा गाठला होता. दुसऱ्या क्रमांकावर नेपाळचा फिरकीपटू संदीप लामिछाने आहे. त्याने 54 सामन्यांत 100 विकेट घेतल्या होत्या. तिसऱ्या क्रमांकावर श्रीलंकेचा अष्टपैलू खेळाडू वानिंदू हसरंगा असून त्याने 63 सामन्यांत 100 विकेट मिळवल्या आहेत.

Comments are closed.