चांगरमकुल येथे दगड गिळल्याने एका वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाला
केरळमधील धक्कादायक घटना
वृत्तसंस्था/ केरळ
चांगर्मकुलम येथे एक वर्षीय अस्लम नूहने स्वत:च्या घराच्या अंगणात खेळत असताना दगड गिळला होता, यामुळे त्याचा मृत्यू झाला आहे. मुलाच्या पित्याचे नाव महफूफ तर आईचे नाव रुमाना आहे. हे दांपत्य कोय्यामकोट्टू, थेक्कुमरी येथील रहिवासी आहेत.
एक वर्षीय मुलाने रविवारी संध्याकाळी दगड गिळला होता, यानंतर त्याची प्रकृती बिघडल्याने त्याला एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मग त्याला कोट्टक्कलच्या रुग्णालयात हलविण्यात आले होते. मुलाच्या गळ्यात दगड अडकल्याने त्याला श्वास घेणे अवघड ठरले होते. रविवारी रात्री उपचार सुरू असताना अस्लम नूहचा मृत्यू झाला आहे. मुलाचे वय पाहता कुठलाही गुन्हा नोंदविण्यात आलेला नाही. प्रारंभिक तपासात चुकून दगड गिळल्याने मृत्यू झाल्याचे नमूद करण्यात आले आहे. मुलाचा मृतदेह परिवाराला सोपविण्यात आला असून त्याच्यावर सोमवारी अंत्यसंस्कार करण्यात आल्याचे चांगर्मकुलम पोलीस स्थानकाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.
Comments are closed.