पुण्यात पोलीस भरतीच्या वेळी मैदानी चाचणीत तरुणाचा मृत्यू
पुण्यातील पोलीस भरतीच्या वेळी मैदानी चाचणीत धावणीच्या वेळी एका 23 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. पुरुषोत्तम बारकुल असे त्या तरुणाचे नाव असून तो मुळचा बुलढाणा जिल्ह्यातील होता.
पुण्यातील शिवाजीनगर पोलीस मुख्यालयाच्या मैदानात ही भरती प्रक्रीया आयोजित केली होती. यावेळी 1600 मीटर धावणीची चाचणी सुरू होती. पुरुषोत्तमने मैदानाचे दोन राऊंड मारले. मात्र त्यानंतर तो फिट येऊन तो बेशुद्ध पडला. त्यानंतर त्याला तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला.
Comments are closed.