तीनच कसोटी सामने का खेळला बुमराह? स्ट्रेंथ कोचने स्पष्ट केली वेगवान गोलंदाजांच्या आव्हानांची कारणं

भारतीय वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah), जो तीनही फॉरमॅटमध्ये टीम इंडियाचा (Team india) सर्वात विश्वासार्ह आणि शानदार गोलंदाज मानला जातो, तो पुन्हा चर्चेत आला आहे. इंग्लंडविरुद्धच्या अलीकडील कसोटी मालिकेच्या अखेरच्या सामन्यात तो खेळला नाही, हीच यामागची मुख्य कारणं होती. त्याच्या अनुपस्थितीत मोहम्मद सिराजची (Mohmmed Siraj) 143 किमी प्रतितास वेगाने टाकलेली चेंडू गस अॅटकिंसनचे स्टंप उखडताच भारताने सामना 6 धावांनी जिंकला आणि मालिका 2-2 अशी बरोबरीत संपली.

बुमराह न खेळल्याने सोशल मीडियावर वाद सुरू झाला आणि सुनील गावसकरांनी (Sunil Gavaskar) अप्रत्यक्ष टीका केली की, देशासाठी खेळताना दुखापत आणि थकवा दुर्लक्षित करावा लागतो. बीसीसीआयने (BCCI) स्पष्ट केले की, बुमराहने स्वतः पाचही कसोटी सामने खेळण्यास नकार दिला होता, कारण त्याच्या शरीराला सतत इतका ताण सहन होत नव्हता. 2024 मेलबर्न कसोटी सामन्यात पाठीच्या दुखापतीवर खेळण्याचा प्रयत्न त्याने केला होता, पण फिटनेस टेस्ट नापास झाल्याने पाचवा कसोटी सामना खेळू शकला नाही.

काहींनी बुमराहने मागील IPLमध्ये 12 सामने खेळल्याचा दाखला देत टीका केली, पण टी20 क्रिकेटही शारीरिक-मानसिक ताण आणणारे असते. माजी स्ट्रेंथ कोच रामजी श्रीनिवासन (Ramji Shrinivasan) यांनी सांगितले की, आजच्या काळात कोणताही खेळाडू उगाच सामने सोडत नाही, यामागे ठोस कारणं असतात. ग्लेन मॅक्ग्रानेही बुमराहला शरीर टिकवण्यासाठी योग्य विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे. 2024 टी20 विश्वचषक जिंकण्यात बुमराहने मोठी भूमिका बजावली होती आणि तो तिन्ही फॉरमॅटमध्ये भारतासाठी मॅच विनर आहे.

Comments are closed.