एआयने काही नोकऱ्या नष्ट केल्यावर उच्च पगाराची पदे निर्माण होतील, ओपन एआयच्या सॅम ऑल्टमन यांच्या वक्तव्याची चर्चा

2035 मध्ये महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण करणारा विद्यार्थी सध्याच्या पिढीप्रमाणे सामान्य नोकरी करणार नाही. त्याऐवजी तो एका अगदी नवीन, उच्च पगाराच्या अंतराळ क्षेत्रातील नोकरीत कार्यरत असेल, असा आशावाद ओपनएआयचे सीईओ सॅम ऑल्टमन यांनी व्यक्त केला. करीअर सुरू करण्यासाठी येणारे दशक हा ‘इतिहासातील सर्वात रोमहर्षक काळ’ असू शकतो. एआयने काही नोकऱया पूर्णपणे नष्ट केल्यानंतर आणि आज अस्तित्वात असलेल्या करीअरचे स्वरूप बदलल्यानंतरच या ‘उच्च पगाराच्या’ पदांची निर्मिती होईल, असेही सॅम ऑल्टमन यांनी म्हटले. पत्रकार क्लिओ अब्राम यांना दिलेल्या मुलाखतीत ऑल्टमन म्हणाले की, आता करीअर सुरू करणाऱया जेन-झेड पिढीचा त्यांना हेवा वाटतो.

Comments are closed.