Oppo ग्राहकांच्या खिशाला कात्री! K14 आणि A6 सिरीजमध्ये जास्त पैसे द्यावे लागतील, जाणून घ्या स्मार्टफोनच्या नवीन किमती

  • Oppo K14 आणि A6 मालिकेच्या स्मार्टफोन्सच्या किमती ₹2,000 पर्यंत वाढवण्यात आल्या आहेत.
  • K14x च्या टॉप व्हेरिएंटची किंमत आता ₹22,999 आहे, तर K14 आणि A6 मालिकेतील इतर मॉडेल देखील महाग आहेत.
  • काही Oppo स्मार्टफोन अजूनही जुन्या किमतीत Amazon वर उपलब्ध आहेत याचा फायदा खरेदीदारांना होऊ शकतो.

टेक कंपनी Oppo त्यांच्या दोन लोकप्रिय स्मार्टफोन्सच्या किमती वाढवण्यात आल्या आहेत. यामध्ये Oppo K14 आणि Oppo A6 सिरीजचा समावेश आहे. कंपनीने या दोन्ही सीरीजमधील स्मार्टफोनच्या किमतीत वाढ केली आहे. कंपनीने स्मार्टफोनच्या किंमतीत 2 हजार रुपयांपर्यंत वाढ केली आहे. त्यामुळे आता हे स्मार्टफोन खरेदी करण्यासाठी ग्राहकांना अतिरिक्त पैसे खर्च करावे लागणार आहेत. चला जाणून घेऊया Oppo स्मार्टफोनच्या नवीन किमती.

फ्लिपकार्ट सेल 2026: Vivo च्या 5G स्मार्टफोनवर बंपर सूट! 6500mAh बॅटरी आणि शक्तिशाली वैशिष्ट्यांसह सुसज्ज… खरेदी करण्याची संधी गमावू नका

Oppo ने सध्या K14x, Standard K14, A6c 4G, A6 आणि A6 Pro स्मार्टफोन्सच्या किंमती वाढवल्या आहेत. Oppo K14x स्मार्टफोनच्या 4GB + 64GB व्हेरिएंटची किंमत यापूर्वी 16,999 रुपये होती. पण आता हे उपकरण खरेदी करण्यासाठी ग्राहकांना 17,999 रुपये खर्च करावे लागतील. तसेच, 4GB + 128GB रॅम आणि स्टोरेजसह डिव्हाइसचा दुसरा प्रकार खरेदी करण्यासाठी ग्राहकांना आता 19,999 रुपये द्यावे लागतील. यापूर्वी या वेरिएंटची किंमत 18,999 रुपये होती. तसेच, 6GB + 128GB रॅम आणि स्टोरेजसह Oppo K14x स्मार्टफोनचा टॉप व्हेरिएंट पूर्वी 20,999 रुपयांमध्ये उपलब्ध होता. पण आता या स्मार्टफोन वेरिएंटची किंमत 22,999 रुपये झाली आहे. (छायाचित्र सौजन्यः Oppo)

Oppo K14 स्मार्टफोन व्हेरिएंटची किंमतही वाढवण्यात आली आहे. स्मार्टफोनच्या 6GB + 128GB व्हेरिएंटची किंमत आता 23,999 रुपये आहे. 6GB + 256GB व्हेरिएंटची किंमत 25,999 रुपये असेल. तसेच, 8GB + 256GB व्हेरिएंटची किंमत 28,999 रुपये आहे. तसेच, Oppo K14x स्मार्टफोनच्या 4GB + 128GB व्हेरिएंटच्या किंमतीत 500 रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. तसेच, 6GB + 128GB व्हेरिएंट 20,000 रुपयांच्या किमतीत खरेदी करता येईल.

Oppo A6 मालिकेबद्दल बोलायचे झाल्यास, A6 स्मार्टफोनच्या 4GB + 128GB व्हेरिएंटची किंमत आता 26,999 रुपये आहे, 6GB + 128GB व्हेरिएंटची किंमत 28,999 रुपये आहे आणि 6GB + 256GB व्हेरिएंटची किंमत 31,999 रुपये आहे. Oppo A6 Pro च्या नवीन किंमतीबद्दल बोलायचे झाल्यास, 8GB + 128GB वेरिएंटची किंमत 32,999 रुपये आणि 8GB + 256GB व्हेरिएंटची किंमत 35,999 रुपये आहे. Oppo A6c 4G स्मार्टफोनची 4GB + 64GB व्हेरिएंटची किंमत 16,999 रुपये आणि 4GB + 128GB व्हेरिएंटची किंमत 18,999 रुपये आहे.

झूम कॉलवर सायबर हल्ल्याचा धोका; एआयच्या मदतीने 'झिरो-क्लिक' हॅकिंग केले जाऊ शकते, सुरक्षिततेसाठी आता या चरणांचे अनुसरण करा

काही रिपोर्ट्सनुसार, यापैकी काही Oppo स्मार्टफोन्स अजूनही Amazon वर त्यांच्या जुन्या किमतीत विक्रीसाठी उपलब्ध आहेत. Oppo ने याआधी एप्रिल आणि जुलैमध्ये यापैकी काही फोनच्या किमती वाढवल्या होत्या.

Comments are closed.