RCB vs SRH: भुवनेश्वर कुमार ऐतिहासिक विक्रमाच्या उंबरठ्यावर! आयपीएल 2026 च्या सलामीच्या सामन्यातच रचणार नवा इतिहास

आयपीएल स्पर्धेचा 19 वा हंगाम उद्यापासून म्हणजेच 28 मार्च शनिवारपासून सुरू होत आहे. या स्पर्धेतील पहिला सामना गतविजेता संघ आरसीबी आणि सनरायझर्स हैदराबाद (RCB vs SRH) या दोन्ही संघात चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. या सामन्यात भारतीय संघाचा अनुभवी वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारकडे इतिहास रचण्याची संधी आहे. तो आयपीएल इतिहासातील सर्वात यशस्वी गोलंदाजांपैकी एक आहे. उद्याच्या सामन्यात आयपीएलमध्ये 200 विकेट्स घेणारा तो पहिला वेगवान गोलंदाज ठरू शकतो. हा टप्पा गाठण्यासाठी त्याला आता फक्त 2 विकेट्सची गरज आहे.
भुवनेश्वर कुमारने आतापर्यंत 190 आयपीएल सामन्यांमध्ये 198 विकेट्स घेतल्या आहेत. यादरम्यान त्याने दोन वेळा 5 विकेट्स घेण्याचा पराक्रम केला आहे. सध्या आयपीएलमध्ये सर्वाधिक विकेट्स घेण्याचा विक्रम युजवेंद्र चहलच्या (221 विकेट्स) नावावर आहे. 200 हून अधिक विकेट्स घेणारा चहल हा एकमेव गोलंदाज आहे. आता भुवी या खास क्लबमध्ये सामील होण्यासाठी सज्ज झाला आहे.
आयपीएलमधील सर्वाधिक विकेट्स घेणारे गोलंदाज:
युजवेंद्र चहल: 174 सामने – 221 विकेट्स
भुवनेश्वर कुमार: 190 सामने – 198 विकेट्स
सुनील नरेन: 189 सामने – 192 विकेट्स
पीयूष चावला: 192 सामने – 192 विकेट्स
आर. अश्विन: 221 सामने – 187 विकेट्स
2025 च्या आयपीएल हंगामात भुवनेश्वर कुमारने (Bhvneshwar Kumar) आरसीबीसाठी (RCB) शानदार कामगिरी केली होती. संघाने विजेतेपद मिळवण्यात त्याचा मोठा वाटा होता. गेल्या मोसमात त्याने 14 सामन्यांत 17 विकेट्स घेतल्या होत्या, ज्यात फायनलमधील 2 महत्त्वाच्या विकेट्सचा समावेश होता. आता नव्या हंगामातही भुवी आपल्या धारदार गोलंदाजीने सर्वांचे लक्ष वेधून घेण्यास तयार आहे.
Comments are closed.