कोकाटेंचा राजीनामा कधी घेणार? अधिवेशनाआधी कामकाज समितीच्या बैठकीत सरकारला विरोधकांनी घेरले

राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन 3 मार्चपासून सुरू होत आहे. अधिवेशनाआधी कामकाज सल्लागार समितीची बैठक आज झाली. या बैठकीत विरोधी पक्षाच्या सदस्यांनी कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याच्या मुद्द्यावरून सरकारला घेरल्याची माहिती आहे.
विधिमंडळ अधिवेशनातील कामकाज ठरवण्यासाठी कामकाज सल्लागार समितीची बैठक घेतली जाते. आज समितीची बैठक झाली. त्यात कामकाजावर चर्चा झाली, पण विरोधकांनी कोकाटे प्रकरणावरून सरकारला धारेवर धरले. न्यायालयाने दोषी ठरवले, शिक्षा सुनावली तरीही कोकाटे यांचा राजीनामा सरकारने का घेतलेला नाही, असा सवाल विरोधी सदस्यांनी केला.
Comments are closed.