राय बरली मधील कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी यांना विरोध
उत्तरप्रदेशच्या मंत्र्याने रोखला वाहनांचा ताफा
वृत्तसंस्था/ रायबरेली
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी हे बुधवारी स्वत:च्या मतदारसंघाच्या दोन दिवसीय दौऱ्यानिमित्त रायबरेलीत पोहोचले. परंतु त्यांच्या दौऱ्याला उत्तरप्रदेश सरकारमधील मंत्री दिनेश प्रताप सिंह यांनी विरोध केला. लखनौ-प्रयागराज महामार्गावर ठाण मांडून बसत दिनेश प्रताप सिंह यांनी राहुल गांधींचा वाहनताफा रोखला आहे. तसेच यादरम्यान सिंह यांच्या समर्थकांनी ‘राहुल गांधींनी परत जावे’ अशा आशयाच्या घोषणा दिल्या. सुमारे 20 मिनिटांपर्यंत राहुल गांधींचा वाहनताया यामुळे महामार्गावर थांबून राहिला.
मंत्री दिनेश प्रताप सिंह यांनी समर्थकांची समजूत काढल्यावर ते शांत झले. राहुल गांधी यांनी माफी मागावी. बिहारमध्ये राहुल गांधींच्या उपस्थित पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मातेबद्दल अपशब्द वापरण्यात आले. हा प्रकार कुठल्याही प्रकारे समाजासाठी योग्य नसल्याचे दिनेश प्रताप सिंह यांनी म्हटले आहे.
Comments are closed.