opreation sindoor Air Strike on Pakistan and PoK indian army officers upendra dwivedi dineshkumar amarpreet singh


पुणे – पहलगाम येथे झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्याला भारतीय लष्कराने अखेर 15 दिवसानंतर सडेतोड प्रत्युत्तर दिले आहे. भारताने या कारवाईला “ऑपरेशन सिंदूर” हे नाव दिले. भारतीय हवाई दलाने एअर स्ट्राईक करुन दहशतवाद्यांच्या 9 ठिकाणांची राखरांगोळी केली. ऑपरेशन सिंदूर नावाने झालेल्या कारवाईत भारतीय लष्कर, हवाई दल आणि नौदल हे तिन्ही दल एकत्र होते. विशेष म्हणजे लष्कराच्या इतिहासात प्रथमच सैन्यदलाचे तिन्ही प्रमुख हे एकाच बॅचचे आहे. 1984 साली पुण्यातील नॅशनल डिफेन्स अकॅडमी (एनडीए) येथे त्यांनी प्रशिक्षण पूर्ण करुन देशसेवेला एकसाथ सुरुवात केली. तिन्ही दलाचे प्रमुख हे एकेकाळचे बॅचमेट आहेत. या तिन्ही मित्रांनी पाकिस्तानचं कंबरडं मोडणारी कारवाई केली आहे. हे तीन मित्र आहेत, सैन्यदलाचे प्रमुख लेफ्टनंट जनरल उपेंद्र द्विवेदी, नौदलाचे प्रमुख कुमार त्रिपाठी आणि हवाई दलाचे प्रमुख मार्शल अमर प्रीत सिंह आहेत.

तिन्ही दलांच्या प्रमुखांच्या नेतृत्त्वात ऑपरेशन सिंदूर राबवण्यात आले. उपेंद्र द्विवेदी यांची 30 जून 2024 रोजी भारतीय लष्कराचे प्रमुख या पदावर नियुक्ती करण्यात आली. द्विवेदींचा जन्म 1 जुलै 1964 मध्ये झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण सैनिकी शाळेत झाले. 1981 मध्ये त्यांनी शिक्षण पूर्ण केले.

द्विवेदी यांनी पुण्यातील खडकवासला येथील राष्ट्रीय संरक्षण अकादमी (एनडीए) येथून पदवी शिक्षण पूर्ण केले. येथील त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल त्यांना ब्लू पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. द्विवेदी हे भारतीय लष्करी अकादमी (आयएमए) येथून जम्मू – काश्मीरच्या 18व्या बटालियनमध्ये सहभागी झाले. उपेंद्र द्विवेदी यांनी मिलिटरी सायन्स आणि स्ट्रॅटिजिक स्टडीज यामध्ये पदवी शिक्षण आहे.

नौदलप्रमुख अॅडमिरल दिनेश कुमार त्रिपाठी यांची 30 मे 2024 रोजी नौदल प्रमुख म्हणून नियुक्ती झाली. त्रिपाठींचा जन्म 15 मे 1964 रोजी झाला. दिनेश त्रिपाठी यांचे शिक्षण सरकारी शाळेतून झाले. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्रिपाठी यांनी रीवा सैनिकी शाळेत प्रवेश घेतला. दिनेश त्रिपाठी यांनी नेव्हल हायर कमांड कोर्स पूर्ण केला आणि नेव्हल ऑपरेशन ट्रेनिंग देखील पूर्ण केले. त्यांनी न्यूपोर्ट येथील यूएस नेव्हल ऑपरेशन ट्रेनिंग घेतले. तेसेच वेस्टर्न नेव्हल कमांडचे ते प्लॅग ऑफिसर कमांडिंग इन चीफ देखील होते.

या त्रिकुटातील तिसरे आहेत एअर मार्शल अमरप्रीत सिंह. सिंह हे हवाईदलप्रमुख आहेत. 30 सप्टेंबर 2024 रोजी त्यांची हवाईदल प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली. भारताच्या लढाऊ विमानांचे ते प्रशिक्षित वैमानिक आहेत. एअर मार्शल अमरप्रीत सिंह हे मिग-21, मिग 29, सुखोई 30, तसेच एमकेआय आणि युद्धात वापरली जाणारी लढाऊ विमानांचे पायलट राहिले आहेत. भारताने पाकिस्तानवर हल्ल्यासाठी हवाईदलाचीच मदत घेतली. अशा प्रकारे पुणे आणि एनडीए अकादमीचे कनेक्शन ऑपरेशन सिंदूर पर्यंत पोहोचले.

हेही वाचा : OPERATION SINDOOR : अणुबॉम्बची धमकी देणाऱ्या मरियम नवाज यांचे आता तोंड बंद; आणीबाणी लागू केली



Source link

Comments are closed.