ओरॅकल इंडियाचे कर्मचारी कमी
12 हजार जणांना काढले, आणखी कपात शक्य
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
‘ओरॅकल इंडिया’ या माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपनीने 12 हजार कर्मचाऱ्यांची मोठी कपात केली आहे. आणखी कपात होण्याची शक्यताही व्यक्त केली जात आहे. या बहुराष्ट्रीय कंपनी असून या जगभरात आतापर्यंत एकंदर 30 हजार कर्मचाऱ्यांची कपात करण्यात आल्याची माहिती कंपनीच्या सूत्रांनी दिली आहे.
भारतात ओरॅकल कंपनीने ओरॅकल इंडिया नामक कंपनी स्थापन केली असून या कंपनीच्या कर्मचाऱ्यांची संख्या कमी करण्यात आलेले कर्मचारी धरुन साधारणपणे 30 हजार आहे. कामावरुन कमी करण्यात आलेल्या काही कर्मचाऱ्यांनी या अचानकपणे करण्यात आलेल्या कपातीची माहिती सोशल मिडियावर प्रसिद्ध केली. त्यानंतर अनेक प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आल्या आहेत. मात्र, अद्याप कंपनीने अधिकृतरित्या कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त झालेली नाही.
सकाळी सहा वाजता ईमेल
कमी करण्यात आलेल्या अनेक कर्मचाऱ्यांना बुधवारी सकाळी 6 वाजता कंपनीच्या वतीने ईमेल करण्यात येऊन कामावरुन कमी केल्याची सूचना देण्यात आली. त्यानंतर कंपनीने त्यांच्या लॉगिंगची सुविधाही काढून घेतली. यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण पसरल्याचे दिसून आले. तथापि, काही वेळानंतर त्यांनी परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी सज्जता केली, अशीही माहिती दिली गेली.
कपात केलेली तिसरी कंपनी
ओरॅकलपूर्वी मेटा आणि अमेझॉन या कंपन्यांनीही मोठ्या प्रमाणात कर्मचारी कपात केली आहे. 16 हजार कॉर्पोरेट कामे कमी करण्याचा निर्णय अमेझॉनने घोषित केला. तसेच त्याआधी 14 हजार नोकऱ्या कमी केल्या. सध्या जगभरात अनेक कंपन्या कर्मचारी कपात करीत असून त्यामुळे कंपनी जगातील हालचालींना वेग आला आहे. व्यवसाय मंदी, एआय आदी कारणांनी ही कपात होत आहे.
ओरॅकलचे कपात पॅकेज
कमी करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांसाठी ओरॅकलने आर्थिक साहाय्यता पॅकेज घोषित केले आहे. कर्मचाऱ्यांना त्यांच्या वर्षभराच्या वेतनाच्या पंधरा दिवसांचे वेतन देण्यात येईल, याशिवाय एक महिन्याचे काढून टाकण्याच्या दिवसापर्यंतचे अनपेड वेतन, रजेची एनकॅशमेंट, ग्रॅच्युईटी (तशी स्थिती असल्यास), एक महिन्याचे नोटीस वेतन आणि दोन महिन्यांचे टॉप अप वेतन देण्यात येणार आहे.
Comments are closed.