पहिले मैत्री, मग नेहा शर्माच्या प्रेमात; अधिकारी रवींद्र कुमार फसला, भारताच्या ड्रीम प्रोजेक्टच
रवींद्र कुमार मध अडकलेला: नवी दिल्ली: उत्तर प्रदेश दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) फिरोजाबादमधील ऑर्डनन्स फॅक्टरी चार्जमन रवींद्र कुमार (Ravindra Kumar) आणि त्याच्या एका साथीदाराला आग्रा येथून अटक केली आहे. पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआयला गुप्त लष्करी आणि वैज्ञानिक माहिती पाठवल्याचा आरोप रवींद्र कुमारवर आहे.
उत्तर प्रदेशातील दहशतवाद विरोधी पथकाने आग्रा येथील ऑर्डिनेंस फॅक्टरीतून फिरोजाबादच्या रवींद्र कुमार आणि त्यांच्या एका सहकाऱ्याला अटक केली आहे. पाकिस्तानी गुप्तचर संस्था आयएसआयला गुप्त लष्करी माहिती आणि वैज्ञानिक माहिती पाठवल्याचा रवींद्र कुमारवर आरोप आहे.
अप: पाकच्या आयएसआयसाठी हेरगिरीसाठी ऑर्डनन्स फॅक्टरी कर्मचारी
वाचा @ानी कथा | https://t.co/l2az24khnm#अपॅट्स #हनीट्रॅपिंग pic.twitter.com/OXH37EJVR0
– दोघेही डिजिटल (@ania_digital) नाही मार्च 14, 2025
पहिले मैत्री मग प्रेमात फसवली-
आयएसआयच्या महिला एजेंटने रवींद्र कुमारसोबत सोशल मीडियावर मैत्री केली. त्यानंतर प्रेमात फसवत रवींद्र कुमारकडून संवेदनशील माहिती जमा करु लागली. या जाळ्यात रवींद्र कुमार अडकत गेला. आता यूपी एटीएस रवींद्र कुमारकडून देशातील आयएसआयच्या नेटवर्कचा शोध घेतला जात आहे. दरम्यान, रवींद्रनेही ‘आयएसआय’ हस्तकाला शस्त्रनिर्मिती कारखान्याशी निगडित अनेक गोपनीय कागदपत्रे पाठवली. त्यामध्ये शस्त्रनिर्मिती कारखान्याच्या दैनंदिन उत्पादन अहवालाचाही समावेश आहे. त्याशिवाय छाननी समितीचे काही दस्तऐवज आहेत. इतकेच नव्हे, तर ड्रोन, गगनयान प्रकल्पाबाबतही महत्त्वाची माहिती उघड करण्यात आली आहे, असे ‘एटीएस’च्या तपासातून समोर आले आहे.
नेमकं प्रकरण काय?
नेहा शर्मा नावाने पाकिस्तानी महिला हस्तकाने रवींद्र कुमारसोबत फेसबुकवर मैत्री वाढवली. दोघांनी एकमेकांना भ्रमणध्वनी क्रमांक दिले. त्यानंतर व्हॉट्सॲपवर चॅट, ऑडिओ आणि व्हिडीओ कॉलही झाले. हळूहळू महिला हस्तकाने रवींद्रकुमारला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवले. त्यानंतर भारताशी निगडित गोपनीय माहिती ही महिला रवींद्र कुमारकडून मिळवू लागली. त्यानंतर पैसांची लालच देवून रवींद्र कुमार याला फसवत राहिली. रवींद्रकुमार याने ऑर्डनन्स फॅक्टरी फिरोजाबादशी संबंधित अनेक गोपनीय कागदपत्रे तिला म्हणजेच पाकिस्तानला पाठवली होती.
भारताची सर्वात मोठी गगनयान मोहीम-
चांद्रयान यशस्वी झाल्यानंतर इस्रोकडून गगनयान मोहीमेची तयारीही सुरू आहे. भारताच्या मानवी अंतराळ मोहीमेला ‘गगनयान’ असं नाव देण्यात आलं आहे. गगनयान मोहिम इस्रोची पहिली मानवी अंतराळ मोहिम असेल. या मोहिमेमध्ये अंतराळवीर पाठवण्याची तयारी सुरू आहे. गगनयान हे भारतीय अंतराळ संस्थेची पहिली मानवी अंतराळ मोहीम असेल. या मोहीमे अंतर्गत तीन अंतराळवीरांना अवकाशात पाठवण्यात येणार आहे. भारतीय हवाई दलातील वैमानिक अंतराळवीर म्हणून अंतराळात जातील. यासाठी त्यांचं प्रशिक्षणही सुरू आहे. येत्या काही महिन्यांत भारताचे सर्वात मोठे मिशन लाँच केलं जाऊ शकतं. या मानवी अंतराळ मोहिमेकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
एबीपी माझाच्या सकाळी 10 वाजताच्या हेडलाईन्स, VIDEO:
https://www.youtube.com/watch?v=vfedv4dlnco
संबंधित बातमी:
अधिक पाहा..
Comments are closed.