इराणमध्ये आमचं काम अजून संपलेलं नाही, बेंजामिन नेतन्याहूंचे मोठे विधान

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यात गेल्या दोन आठवड्यांपासून सुरू असलेला शस्त्रसंधी २२ एप्रिल रोजी संपुष्टात येत आहे. या पार्श्वभूमीवर इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी एक मोठे विधान केले असून, यामुळे पुन्हा एकदा युद्धाचे ढग गडद झाले आहेत. इराणमध्ये इस्रायलने आपले काम अजून पूर्ण केलेले नाही, असे नेतन्याहू यांनी स्पष्टपणे म्हटले आहे.

‘आज तक’च्या वृत्तानुसार, जेरुसलेममध्ये आयोजित एका स्मृती दिन कार्यक्रमात नेतन्याहू यांनी हे विधान केले. आंतरराष्ट्रीय स्तरावर शांततेसाठी प्रयत्न सुरू असतानाच त्यांनी पुन्हा एकदा युद्ध सुरू होण्याचे संकेत दिले आहेत. एकीकडे अमेरिका हा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानमध्ये पुन्हा एकदा चर्चा सुरू करण्याच्या तयारीत आहे. तर दुसरीकडे नेतन्याहू यांच्या या भूमिकेने खळबळ माजली आहे. या संभाव्य चर्चेसाठी इस्लामाबादमध्ये सुरक्षेची कडक व्यवस्था केली जात आहे.

यापूर्वी ११ एप्रिल रोजी इस्लामाबादमध्ये अमेरिका आणि इराण यांच्यात शांतता चर्चा पार पडली होती. अमेरिकेच्या वतीने जेडी वेंस आणि इराणच्या वतीने परराष्ट्र मंत्री अराघची यांनी या चर्चेचे नेतृत्व केले होते. मात्र इराणचे अणुस्त्रे आणि स्ट्रेट ऑफ हॉर्मुझशी संबंधित मुद्द्यांवर दोन्ही देशांमध्ये एकमत होऊ शकले नाही. परिणामी ही शांतता चर्चा अयशस्वी ठरली होती.

Comments are closed.