IND vs PAK: सरेंडर तर करणार नाही.., उस्मान तारिकबाबत भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादवचे मोठे विधान

15 फेब्रुवारीला कोलंबोच्या प्रेमदासा स्टेडियमवर होणाऱ्या भारत-पाकिस्तान (india vs Pakistan) महामुकाबल्यात सर्वांच्या नजरा एका खेळाडूवर खिळल्या आहेत. तो म्हणजे पाकिस्तानचा ‘मिस्ट्री स्पिनर’ उस्मान तारिक. त्याच्या वेगळ्या गोलंदाजीच्या शैलीमुळे भारतीय फलंदाज त्याचा सामना कसा करणार, याबाबत कमालीची उत्सुकता आहे.
सामन्याच्या आदल्या दिवशी झालेल्या पत्रकार परिषदेत जेव्हा भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादवला (Suryakumar Yadav on Usman Tariq) उस्मान तारिकबद्दल विचारण्यात आले, तेव्हा त्याने अतिशय मजेशीर पण आत्मविश्वासपूर्ण उत्तर दिले.
पत्रकाराने उस्मान तारिकला ‘आऊट ऑफ सिलॅबस’ (अभ्यासाबाहेरचा) प्रश्न म्हटल्यावर सूर्या म्हणाला, बघा, कधीकधी परीक्षेतही असे प्रश्न येतात जे अभ्यासाबाहेरचे असतात, पण म्हणून आपण तो प्रश्न सोडून देऊ शकत नाही. त्याला सामोरे जाण्यासाठी आपल्याला काहीतरी वेगळे प्रयत्न करावे लागतात.
सूर्याने पुढे स्पष्ट केले की, “हो, तो (उस्मान) एक वेगळ्या प्रकारचा गोलंदाज आहे, त्याचे वैशिष्ट्य वेगळे आहे. पण म्हणून आपण त्याच्यासमोर शरणागती (Surrender) पत्करू शकत नाही. उस्मान तारिकचा सामना करण्यासाठी भारतीय संघाने जय्यत तयारी केली आहे. यावर बोलताना कर्णधार म्हणाला, आम्ही नेट प्रॅक्टिसमध्ये त्याच्यासारखी अॅक्शन असलेल्या गोलंदाजांविरुद्ध सराव करत आहोत. जे आम्ही सरावात शिकलो, तेच मैदानात करून दाखवू.
Comments are closed.