राज्यात दोन कोटी मतदार यादीतून वगळले; 35 लाख मतदार मृत, 75 लाख गैरहजर, 76 लाख स्थलांतरीत, 18 लाख दुबार
राज्यात राबविण्यात आलेल्या मतदार यादी विशेष पुनरिक्षण मोहिमेत तब्बल 2 कोटी 7 लाख मतदार यादीतून वगळण्यात आल्याची माहिती निवडणूक आयोगाने आज जाहीर केली.
एसआयआर मोहिमेत 35 लाख मतदार मृत आढळून आले. तपासणीवेळी 75 लाख 22 हजार मतदार गैरहजर, तर 76 लाख 80 हजार स्थलांतरीत झाल्याचे दिसून आले. 18 लाख मतदारांची दुबार म्हणून नोंद झाली. इतर 2 लाख 23 हजार मतदार विविध कारणास्तव वगळले गेल्याची माहिती निवडणूक आयोगाने दिली.
प्रारूप मतदार यादी लवकरच प्रसिद्ध करण्यात येणार असून त्याची प्रत सर्व राजकीय पक्षांना देण्यात येणार आहे. त्यानंतर एका महिन्याच्या कालावधीत दावे व हरकती दाखल करता येतील. यादीत नाव समाविष्ट करण्यासाठी पात्र मतदारांना अर्ज 6 भरावा लागेल. मतदार नोंदणी अधिकारी अर्जांची पडताळणी करून पुढील निर्णय घेतील असे आयोगाने कळवले आहे.
फाशीच्या ऐवजी गोळी घातल्यास काही मिनिटांत माणसाचा जीव जातो, तर विषारी इंजेक्शनने पाच मिनिटांत माणूस मरतो. त्यामुळे अशा पर्यायांचा विचार व्हायला हवा, अशी मागणी त्यांनी केली होती. न्यायमूर्ती विक्रम नाथ आणि न्या. संदीप मेहता यांच्या खंडपीठापुढे ही याचिका फेटाळली. यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आधीच्या निर्णयाचा फेरविचार करण्याइतपत सबळ कारणे याचिकाकर्त्याने दिलेली नाहीत, असे खंडपीठाने स्पष्ट केले. यावर पुन्हा कधीच फेरविचार होणार नाही असे नाही, हेही न्यायालयाने नमूद केले.
Comments are closed.