Antibiotics : ऍटीबायोटिक्सचा अतिवापर मुलांसाठी हानिकारक
सर्दी-खोकला, साधा ताप जरी आला तरी लगेचच ऍटीबायोटिक्स antibiotics घेण्याची सवय अनेकांना असते. केवळ वयोवृद्धच नाही तर लहान मुलांनाही चॉकलेट-गोळ्यासारखे ऍटीबायोटिक्स दिले जातात. पण, तज्ज्ञांच्या मते, लहान मुलांना वारंवार देणे चुकीचे आहे, कारण ऍटीबायोटिक्सचा जास्त वापर किंवा विचार न करता देणे मुलांच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते. ऍटीबायोटिक्स निश्चितच बॅक्टेरियाच्या संसर्गावर उपचार करण्यासाठी फायदेशीर असतात. पण, वारंवार किंवा चुकीच्या पद्धतीने मुलांच्या शरीरावर वाईट परिणाम करणारे ठरू शकते.,हे सुद्धा तितकेच खरे आहे. लहान मुलांना वारंवार ऍटीबायोटिक्स दिल्याने त्यांच्या शरीरावर काय परिणाम होतो, हे जाणून घेऊयात.
ऍटीबायोटिक्सचा परिणाम –
- जर मुलं आजारी पडल्यावर तुम्ही सतत ऍटीबायोटिक्स देत असाल शरीराला स्वत:हून रोगाशी लढण्याची संधी मिळत नाही. यामुळे मुलाची रोगप्रतिकारकशक्ती कमकुवत होते आणि ते पुन्हा पुन्हा आजारी पडता.
- ऍटीबायोटिक्स केवळ वाईट बॅक्टेरियाच नाही तर चांगले बॅक्टेरिया नष्ट करतात. यामुळे पोटाच्या तक्रारी उद्भवू शकतात. जसे की, पोटदुखी, गॅस, अपचन.
- काही मुलांना ऍटीबायोटिक्सची ऍलर्जी असू शकते. जसे की, खाज येणे, पुरळ उठणे, त्यामुळे महान मुलांना डॉक्टरांच्या सल्लानुसार ऍटीबायोटिक्स द्यावेत.
- विषाणूजन्य संसर्ग जसे की, सर्दी, फ्लू. यावर ऍटीबायोटिक्स हवा तसा परिणाम देत नाही. त्यामुळे अशी औषधे मुलांना न दिलेलीच बरी.
- ऍटीबायोटिक्समुळे उलट्या, पोटदुखी सुरू होऊ शकते. त्यामुळे कोणतेही ऍटीबायोटिक्स दिल्यावर मुलांना हा त्रास झाल्यास त्वरीत डॉक्टरांकडे घेऊन जा.
- पोटातील चांगले बॅक्टेरिया नष्ट झाल्यामुळे अन्नातून मिळणारे व्हिटॅमिन्स,आयर्न शरीरात योग्यरित्या पोहोचू शकत नाही. त्यामुळे मुलांच्या वाढीक अडथळे येऊ शकतात.
- प्रत्येकवेळी औषधे दिल्याने मुलांची रोगप्रतिकारकशक्ती पूर्णपणे विकसित होत नाही. ज्यामुळे जसेजसे वय वाढत जाते. त्यानुसारते विविध संक्रमणाला बळी पडतात.
हेही पाहा –
Comments are closed.