आंजर्ले सावणे येथील बिचवर भटकंतीसाठी आलेल्या पर्यटकांचा अतिउत्साह नडला ; एसयूव्ही कार समुद्राच्या पाण्यात बुडाली

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

आंजर्ले येथील सावणे समुद्र किनाऱ्यावर भटकंती करिता आलेल्या पूणे येथील पर्यटकांचा अतिउत्साहीपणा त्यांना चांगलाच नडला त्यांची एसयूव्ही कार त्यांनी मौज मस्तीकरिता समुद्राच्या पाण्यात घातली आणि कार समुद्राच्या पाण्यात बुडाली त्यामुळे त्यांना चांगलाच घाम फुटला.

दापोली येथील स्वच्छ सुंदर समुद्र किनारपट्टीची भुरळ अनेकांना पडते. ज्यांना समुद्राचे दर्शन होत नाही असे लोक पर्यटनासाठी दापोली तालुक्यातील समुद्र किनाऱ्यावर येत असतात तसे सध्या उष्णतेच्या उकाड्याने त्रस्त झालेले अनेकजण दापोलीतील समुद्र किनाऱ्यावर भटकंतीसाठी पर्यटक मोठ्या प्रमाणात आले आहेत. समुद्रकिना-याचे आकर्षण असलेल्या अशाच पूणे येथून आलेल्या पर्यटकांना त्यांचा अतिउत्साह नडला. त्यांनी आणलेली एसयूव्ही कार आंजर्ले येथील सावणे किनाऱ्यावरील समुद्राच्या पाण्यात मौज मजेसाठी घातली खरी मात्र कार समुद्राच्या पाण्यात बुडाल्याने त्यांचा चांगलाच हिरमोड झाला.

पुणे येथील काही पर्यटक एसयूव्ही कार घेऊन भटकंतीसाठी दापोली येथे आलेले होते. ते आंजर्ले सावणे येथील समुद्र किनाऱ्यावर मौज मजा करण्यासाठी समुद्र किनाऱ्यावर दाखल झाले. स्वच्छ सुंदर सपाट समुद्र किनारपट्टी पाहून त्यांनी आणलेली एसयूव्ही कार समुद्र किनाऱ्यावर नेली. सुंदर स्वच्छ आणि मोकळी विस्तारीत समुद्र किनाऱ्यावर दौड करता करता त्यांनी समुद्राच्या पाण्यात कार चालवण्याचे धाडस केले. कार समुद्राच्या पाण्यात बुडाल्याने त्यांनी केलेले धाडस त्यांच्या चांगलेच अंगलट आले.

Comments are closed.