पहलगाम हल्ल्यानंतर हिंदुस्थानच्या अ‍ॅक्शनने पाकिस्तानला हादरा, 70 हजार कोटींचं नुकसान

जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर संपूर्ण देशात संतापाची लाट उसळली आहे. अशातच हिंदुस्थानने केलेल्या कारवाईमुळे पाकिस्तानला मोठा फटका बसला आहे. हिंदुस्थानने पाकिस्तानविरुद्ध केलेल्या कारवाईमुळे पाकिस्तानच्या शेअर बाजारात मोठी घसरण झाली आहे. हिंदुस्थानच्या कारवाईनंतर पाकिस्तानच्या शेअर बाजाराला सुमारे 70 हजार कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. गेल्या काही दिवसात कराची स्टॉक एक्सचेंज 4.50 टक्क्यांहून अधिक घसरला आहे. मंगळवारीही केएसईमध्ये 1100 पेक्षा जास्त अंकांची घसरण दिसून आली आहे. याउलट हिंदुस्थानच्या शेअर बाजारात तेजी दिसून आली आहे. 22 तारखेनंतर सेन्सेक्समध्ये सुमारे 1100 अंकांची वाढ झाली आहे.

पाकिस्तानला 70 हजार कोटी रुपयांचे नुकसान

पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानच्या शेअर बाजाराचे मोठे नुकसान झाले आहे. 22 एप्रिल रोजी कराची स्टॉक एक्सचेंजचे मार्केट कॅप 52.84 अब्ज डॉलर्स होते. 29 एप्रिल रोजी केएसई 100 च्या खालच्या पातळीपर्यंत पोहोचल्यानंतर ते 50.39 अब्ज डॉलर्सवर आले. म्हणजेच या काळात पाकिस्तानच्या शेअर बाजाराला 2.45 अब्ज डॉलर्सचे नुकसान झाले आहे. जर आपण ते पाकिस्तानी रुपयांमध्ये मोजले तर सुमारे 70 हजार कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.

Comments are closed.