दहशतवाद्यांची साथ देणाऱ्यांना सोडणार नाही, धडा शिकवण्याची रणनीती ठरली; अमेरिकेचे महत्त्वाचे संकेत

पहलगाम हल्ल्यानंतर हिंदुस्थान आणि पाकिस्तानात तणाव शिगेला पोहचला आहे. हिंदुस्थानकडून लष्करी कारवाईच्या भीतीने पाकिस्तानची टरकली आहे. पाकिस्तानी नेते युद्धाबाबत दर्पोक्ती करत असले तरी कारवाईची धास्ती त्यांनी घेतली आहे. आता या तणावाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जेम्स डेव्हिड व्हान्स यांचे मोठे विधआन केले असून महत्त्वाचे संकेत दिले आहेत. या तणावात अमेरिका हिंदुस्थानच्या बाजूने असून दहशतवाद्यांचा खात्मा झालाच पाहिजे, अशी भूमिका अमेरिकेने घेतली आहे.

कोणत्याही परिस्थितीत दहशतवाद्यांची साथ देणाऱ्यांना सोडण्यात येणार नाही. दहशवाद पोसणाऱ्या पाकिस्तानला धडा शिकवण्याची रणनीती ठरली आहे, असे व्हान्स म्हणाले. दोन्ही देशात तणाव वाढला असला तरी थेट युद्ध होऊ नये, अशी आमची इच्छा आहे. त्याचे अनेक दुष्परिणाम होणा आहेत. मात्र, दहशतवादाचा आणि दहशतवाद्यांना पोसणाऱ्यांचा खात्मा व्हायलाच पाहिजे. दहशतवादाविरोधातील लढाईत अमेरिका हिंदुस्थानसोबत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच दहशतवादाविरोधात पाकिस्तानने हिंदुस्थानला मदत केली पाहिजे, असेही ते म्हणाले. पाकिस्तानात आश्रय घेतलेल्या दहशतवाद्यांचा शोध घेऊन त्यांचा खात्मा केला पाहिजे, असेही ते म्हणाले. त्यांच्या या वक्तव्याने महत्त्वाचे संकेत मिळत असल्याचे सांगण्यात येत आहे.

Comments are closed.