भारताविरोधात वायफळ बडबड करणाऱ्या शाहीद आफ्रिदीला दणका, केंद्र सरकारनं अखरे ‘तो’ निर्णय घेतलाच
शाहिद आफ्रिदी यूट्यूब चॅनेलने भारतात बंदी घातली: पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तान क्रिकेट संघाचा माजी कर्णधार शाहीद आफ्रिदीनं भारताविरोधात गरळ ओकली होती. भारत सरकारनं आता शाहीद आफ्रिदीला दणका देणारा निर्णय घेतला आहे. भारतात कोणताही व्यक्ती यापुढं शाहीद आफ्रिदीचा यूटयूब चॅनेल पाहू शकणार नाही. भारत सरकारनं यापूर्वी देखील काही पाकिस्तानी वृत्तवाहिन्या आणि क्रिकेटपटूंच्या यूट्यूब चॅनेलवर बंदी घातली होती. शोएब अख्तर, राशिद लतीफ आणि तनवीर अहमद या खेळाडूंच्या यूट्यूब चॅनेलवर भारतात बंदी घालण्यात आली आहे.
शाहीद आफ्रिदीनं मागितलेले पुरावे
जम्मू काश्मीरमधील पहलगाममध्ये दहशतवादी हल्ल्यासंदर्भात शाहीद आफ्रिदीनं एक वक्तव्य केलं होतं. तो म्हणालेला की या घटनेवर राजकारण होऊ नये यावर माझा विश्वास आहे. मात्र, जसा पाकिस्तानमध्ये हल्ला झाला तसा थेट पाकिस्तानचं नाव घेतलं गेलं. भारतानं पुराव्यासह समोर यावं आणि जगाला सांगावं, कोणताही धर्म दहशतवादाला पाठिंबा देत नाही, असं शाहीद आफ्रिदी म्हणाला.
भारतात जे घडलं ती खेदाची गोष्ट आहे, पाकिस्तानात जे होत असतं ते देखील खेदजनक असते. मात्र, असं होऊ नये. तो म्हणाला दोन्ही शेजारी देशांनी चांगल्या प्रकारे राहायला हवं, लढाई आणि वाद टाळावेत.
शाहिद आफ्रिदीनं वायफळ बडबड सुरुच ठेवली. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतातील माध्यमांचं बॉलिवूड झाल्याचं म्हटलं. प्रत्येक गोष्टीला बॉलिवूड करु नका, मी हैराण झालो, इतर लोक याची मजा घेत होते. भारतात फटाका फुटला तरी लोक म्हणतात पाकिस्ताननं फोडला. तुमची 8 लाख सैन्याची फैज काश्मीरमध्ये आहे. म्हणजेच तुम्ही तुमच्या लोकांना सुरक्षा देऊ शकला नाही,असं शाहीद आफ्रिदी म्हणाला होता.
पहलगाम दहशतवादी हल्ल्यात 26 जणांचा मृत्यू
जम्मू काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यातील पहलगाममध्ये 22 एप्रिलला दहशतवाद्यांनी भ्याड हल्ला केला होता. या हल्ल्यात 26 जणांचा मृत्यू झाला होता.या हल्ल्यानंतर संपूर्ण देशभर संतापाची लाट आहे. भारत सरकारनं पाकिस्तान विरोधात काही कठोर निर्णय घेतले आहेत. भारताच्या या आक्रमक कारवाईचे पडसाद पाकिस्तानात दिसून येत आहेत. पाकिस्तान स्टॉक एक्सचेंज 3500 अंकांनी गडगडला आहे.
अधिक पाहा..
Comments are closed.