सैंधव मीठ, पेशावरी चप्पल ते लाहोरी कुर्ते, पाकिस्तानातून भारतात कोणकोणत्या वस्तू येतात?
भारत पाकिस्तान व्यापार: पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तान विरोधात कठोर पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे. नुकताच भारताने पाकिस्तानला एक झटका दिला आहे. किस्तानसोबतच्या सर्व प्रकारच्या आयातीवर बंदी घातली आहे. या बंदी अंतर्गत, आता पाकिस्तानमधून येणाऱ्या कोणत्याही उत्पादनाच्या आयातीवर पूर्ण बंदी असणार आहे. मग ती थेट आयात असो किंवा तिसऱ्या देशातून आयात असो. दरम्यान पाकिस्तानमधून भारतात कोणता माल येत याबाबतची माहिती तुम्हाला आहे का? जाणून घेऊयात सविस्तर माहिती.
भारत आणि पाकिस्तानमधील संबंधांमधील तणावाचा परिणाम दोन्ही देशांच्या व्यापारावरही होतो. भारत सरकारने पाकिस्तानमधून सर्व प्रकारच्या आयातीवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयानंतर, पाकिस्तानमधून भारतात कोणत्या वस्तू येतात याबाबतची माहिती पाहुयात. पाकिस्तानी कुर्ती, पेशावरी चप्पल आणि खडे मीठ पाकिस्तानातून मोठ्या प्रमाणात भारतात येते.
सैंधव मीठ (हिमालयन रॉक सॉल्ट)
भारतात उपवास आणि आयुर्वेदिक उद्देशाने वापरले जाणारे सैंधव मीठ प्रत्यक्षात पाकिस्तानातील खेवराच्या खाणींमधून येते. याला हिमालयन रॉक सॉल्ट असेही म्हणतात आणि ते सर्वात प्रमुख पाकिस्तानी उत्पादनांपैकी एक होते जे भारतात मोठ्या प्रमाणात आयात केले जात असे.
सुक्री मेवा
पाकिस्तानातील बलुचिस्तान आणि पेशावर प्रदेशातून बदाम, अक्रोड, मनुका आणि अंजीर यांसारखे सुके फळे भारतात पाठवले जात होते. विशेषतः सण आणि हिवाळ्याच्या काळात त्यांची मागणी वाढते.
पेशावरी चप्पल
टिकाऊपणा आणि पारंपारिक डिझाइनसाठी प्रसिद्ध असलेला पेशावरी चप्पल उत्तर भारतातील अनेक राज्यांमध्ये विशेषतः लोकप्रिय होता. ते विशेषतः पुरुषांच्या पारंपारिक पोशाखाचा एक भाग बनले होते.
लाहोरी कुर्ते आणि कपडे
लाहोरच्या प्रसिद्ध भरतकाम आणि डिझाइनसह कुर्ता, सलवार-सूट आणि इतर कपडे भारतात लोकप्रिय होत होते. अनेक फॅशन ब्रँड या कुर्त्यांना खास डिझाइन म्हणून प्रमोट करायचे.
कापूस
भारत पाकिस्तानमधून कापूस, सेंद्रिय रसायने, मिठाई उत्पादने आणि चष्म्यांमध्ये वापरले जाणारे ऑप्टिक्स देखील आयात करतो. याशिवाय, भारत पाकिस्तानकडून स्टील आणि सिमेंट देखील आयात करतो.
भारत सरकारच्या या निर्णयानंतर, या सर्व उत्पादनांची आयात आता पूर्णपणे थांबली आहे. यामुळे केवळ पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेलाच धक्का बसणार नाही तर भारतीय बाजारपेठेत विशिष्ट प्रकारच्या उत्पादनांच्या उपलब्धतेवरही परिणाम होऊ शकतो. मात्र, भारत आधीच स्वयंपूर्णतेकडे वेगाने वाटचाल करत आहे, त्यामुळे लवकरच बाजारात यासाठी पुरवठ्याचा पर्याय निर्माण होऊ शकतो.
महत्वाच्या बातम्या:
India banned import from Pakistan : पाकिस्तानची आर्थिक नाकेबंदी सुरुच; केंद्र सरकारकडून आणखी एक मोठा दणका; अर्थव्यवस्थेला तगडा झटका बसणार
अधिक पाहा..
Comments are closed.