1 दिवसही पाकिस्तानचा भारतासमोर निभाव लागणार नाही, युद्धाच्या बाता मारणाऱ्यांचं खरं वास्तव काय?

पहलगम दहशतवादी हल्ला: पहलगाम हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील तणाव शिगेला पोहोचला आहे. या हल्ल्यात 26 जणांचा मृत्यू झाला आहे. यानंतर भारताने कठोर निर्णय घेत सिंधू जल करार रद्द केला आहे. या निर्णयांमुळे हताश झालेले पाकिस्तानचे नेते सतत युद्धाबाबत बोलत आहेत. मात्र, अशा अनेक मुद्द्यांवरून धमक्या देणाऱ्या पाकिस्तानचा भारताकडून पराभव होत आहे. मग ती आर्थिक ताकद असो वा परकीय चलन चलनसाठा. महत्वाच्या 7 क्षेत्रात भारताने पाकिस्तानवर मोठी आघाडी मिळवली आहे.

भारताचा जीडीपी, शेअर बाजार आणि जागतिक स्थिती सातत्याने मजबूत होत असताना, पाकिस्तान कर्ज आणि गरिबीच्या गर्तेत बुडाला आहे. पण कदाचित हे आकडे काय सांगत आहेत, हे वाईट हेतू असलेल्या पाकिस्तानच्या नेत्यांना माहीत नसेल. अशा स्थितीत पाकिस्तानचे काही नेते युद्धाची भाषा करत आहेत.

महागाईमुळे पाकिस्तान मोठ्या अडचणीत

आर्थिक स्थिती बिकट असल्यामुळं पाकिस्तानचे लोक आधीच मदत मागत आहेत. 2024 मध्ये पाकिस्तानमधील सरासरी चलनवाढीचा दर सुमारे 24 टक्के होता, जो जगातील सर्वोच्च दरांपैकी एक आहे. खाण्यापिण्यासाठी लोकांची धडपड सुरु आहे. अनेक ठिकाणी रेशन दुकाने लुटल्याचे बातम्या समोर येत आहेत. त्या तुलनेत, भारतातील किरकोळ चलनवाढीचा दर फक्त 4 टक्के इतकाच राहिला आहे. जे स्पष्टपणे दर्शवते की भारताची आर्थिक धोरणे अधिक स्थिर आणि मजबूत आहेत. जो देश महागाईने रोज मरत आहे, तो देश युद्धात स्वतःहून 10 पट अधिक शक्तीशाली देशाशी लढण्याचा विचारही कसा करु शकतो?

काय आहे पाकिस्तानची आर्थिक स्थिती?

आर्थिक आघाडीवर पाकिस्तान भारताशी बरोबरी करg शकत नाही. आज भारताचा GDP सुमारे 3.7 ट्रिलियन डॉलर आहे. भारत जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. तर पाकिस्तानचा जीडीपी फक्त 340 अब्ज डॉलर आहे. हा फरक पाकिस्तान ज्या भयंकर गरिबी आणि आर्थिक संकटातून जात आहे ते दाखवतो. भारत जागतिक गुंतवणुकीचे केंद्र बनत असताना पाकिस्तान कर्जासाठी आंतरराष्ट्रीय संस्थांचे दरवाजे ठोठावत आहे.

शिक्षणातही पाकिस्तान भारताच्या मागे

शैक्षणिक क्षेत्रातही पाकिस्तान भारतापेक्षा खूपच मागे आहे. UNESCO च्या 2025 च्या अंदाजानुसार, भारतात प्रौढ साक्षरता दर सुमारे 76.32 टक्के आहे. तर पाकिस्तानमध्ये हा दर फक्त 59.13 टक्के आहे. भारत आपल्या जीडीपीच्या 4.5 ते 4.8 टक्के शिक्षणावर खर्च करतो, तर पाकिस्तान फक्त 2.9 टक्के खर्च करु शकतो. उत्तम शिक्षण प्रणाली भविष्यात भारताला अधिक शक्तिशाली बनवत आहे तर पाकिस्तान आपल्या पुढच्या पिढीला पुरेशी संसाधने आणि संधी प्रदान करण्यात अपयशी ठरत आहे.

लष्करी ताकदीत दोन्ही देशाची काय स्थिती?

भारताचे संरक्षण बजेट सध्या 78.7 अब्ज डॉलर्स आहे, तर पाकिस्तानचे संरक्षण बजेट केवळ 7.6 अब्ज डॉलर्स आहे. म्हणजे भारताचे लष्करी बजेट पाकिस्तानच्या तुलनेत जवळपास दहापट जास्त आहे. याचा सरळ अर्थ असा आहे की भारताकडे अधिक आधुनिक शस्त्रे, उत्तम प्रशिक्षण सुविधा आणि मजबूत लष्करी यंत्रणा आहे. भारताशी स्पर्धा करण्यासाठी पाकिस्तानकडे संसाधनांची तीव्र कमतरता आहे.

पाकिस्तानची आरोग्य यंत्रणा दयनीय

आरोग्याच्या क्षेत्रातही पाकिस्तानची स्थिती अत्यंत दयनीय आहे. भारत त्याच्या आरोग्य क्षेत्रावर त्याच्या GDP च्या सुमारे 4 टक्के खर्च करत आहे, तर पाकिस्तानचा एकूण आरोग्य खर्च 2.9 टक्के आहे. त्यावर सरकारी खर्च फक्त 1.2 ते 1.5 टक्के आहे. याचा अर्थ पाकिस्तानमधील आरोग्य सेवांची स्थिती अत्यंत वाईट आहे. कोविड नंतर भारताने आपल्या आरोग्य पायाभूत सुविधांमध्ये केलेल्या जलद सुधारणांचे आता जागतिक स्तरावर कौतुक होत आहे.

परकीय चलन साठा कोणत्या देशाकडे किती?

परकीय चलन साठ्याचा विचार केला तर पाकिस्तानची स्थिती अत्यंत वाईट आहे. भारताकडे सध्या परकीय चलनाचा साठा सुमारे 678 अब्ज डॉलर आहे, ज्यामुळे तो जागतिक आर्थिक धक्क्यांपासून स्वतःचे संरक्षण करू शकतो. त्या तुलनेत पाकिस्तानकडे केवळ 8 अब्ज डॉलर्स परकीय चलन साठा आहे. त्यामुळं त्यांना आवश्यक असलेल्या वस्तू खरेदी करणेही कठीण होत आहे. तिजोरी रिकामी असताना युद्ध लढण्याची चर्चा केवळ दिवास्वप्नच राहते.

शेअर बाजारात भारताची मजबूत स्थिती

शेअर बाजाराच्या स्थितीत पाकिस्तान भारतापेक्षा खूपच मागे आहे. सुमारे 4 ट्रिलियन डॉलर मार्केट कॅपसह भारतीय शेअर बाजार सध्या आशियातील सर्वात मजबूत आहे. याउलट, पाकिस्तानचा शेअर बाजार 100 अब्ज डॉलरपेक्षा कमी बाजार भांडवलापुरता मर्यादित आहे. हा फरक गुंतवणूकदारांच्या आत्मविश्वासाचा आणि आर्थिक ताकदीचा मोठा पुरावा आहे.

या सर्व आकडेवारीवरून आणि वस्तुस्थितीवरून हे स्पष्ट होते की, पाकिस्तान केवळ लष्करीच नव्हे तर आर्थिक, शैक्षणिक, आरोग्य, आर्थिक अशा प्रत्येक आघाडीवर भारताच्या मागे आहे. अशा परिस्थितीत युद्धाची धमकी देणे किंवा भारताला आव्हान देणे पाकिस्तानसाठी आत्मघातकी ठरु शकते.

https://www.youtube.com/watch?v=MO3I3MW4KDC

महत्वाच्या बातम्या:

Pahalgam Terror Attack : काश्मीरातील पाच दहशतवाद्यांची घरं ब्लास्ट करुन उद्ध्वस्त केली, पहलगाम हल्ल्यानंतर भारतीय लष्कर आक्रमक

अधिक पाहा..

Comments are closed.