PAKvsNAM: साहिबजादा फरहानचे तुफानी शतक! टी20 वर्ल्डकप इतिहासात केले ‘हे’ दोन रेकॉर्ड

आयसीसी पुरूष टी२० विश्वचषक २०२६मध्ये आजचा (१८ फेब्रुवारी) दुसरा सामना पाकिस्तान विरुद्ध नामिबिया यांच्यात खेळला गेला. सुपर-८मध्ये पोहोचण्यासाठी पाकिस्तानला हा सामना जिंकणे महत्वाचे. त्यामुळे त्यांनी तशी धावसंख्याही उभारली. त्यांचा सलामीवीर फलंदाज साहिबजादा फरहानने या सामन्यात शतकी खेळी केली. त्याने ५७ चेंडूत १०० धावा पूर्ण केल्या. त्याने या सामन्यातील सर्व २० षटके खेळली. तसेच तो या स्पर्धेच्या चालू आवृत्तीत शतकी खेळी करणारा तिसरा फलंदाज ठरला आहे.
फरहानने फलंदाजीला सुरूवातच आक्रमक केली. त्याने एका पाठोपाठ एक नामिबियाच्या गोलंदाजांचा समाचार घेतला. तो ५८ चेंडूत १०० धावा करत नाबाद राहिला. यामध्ये त्याने ११ चौकार आणि ४ षटकार मारले. याआधी त्याने भारताविरुद्ध भोपळाही फोडला नव्हता. त्याला हार्दिक पांड्याने बाद केले होते.
फरहान टी२० विश्वचषकात शतकी खेळी करणारा दुसरा पाकिस्तानी खेळाडू ठरला. १२ वर्षानंतर पुन्हा एकदा पाकिस्तानी फलंदाजाने या स्पर्धेत शतकी खेळी केली आहे. त्याआधी २०१४मध्ये अहमद शहजादने शतक केले होते. तेव्हा तो टी२० विश्वचषकाच्या इतिहासात शतक करणारा युवा फलंदाज ठरला होता. त्याचा हा विक्रम कालच (१७ फेब्रुवारी) कॅनडाच्या युवराज समाराने तोडला.
फरहान शतक करताच या आवृत्तीत सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत पहिल्या स्थानी आला आहे. त्याने ४ सामन्यात २२० धावा केल्या. त्यामध्ये २१ चौकार आणि ११ षटकारांचा समावेश आहे. दुसऱ्या स्थानी दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार एडन मार्करम आहे. त्याने ४ सामन्यात १७८ धावा केल्या आहेत. तसेच फरहानने या आवृत्ती सर्वाधिक षटकार मारण्याची कामगिरी केली आहे. हे करताना त्याने भारताचा ईशान किशनला मागे टाकले आहे. ईशानने १० षटकार मारले आहेत. तसे तो आज हा विक्रम मोडू शकतो.
पाकिस्तानची ही टी२० विश्वचषकाच्या इतिहासातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वोच्च धावसंख्या ठरली आहे. त्यांनी २०१६च्या आवृत्तीत बांग्लादेशविरुद्ध २०१ धावसंख्या केली होती.
या सामन्यात पाकिस्तानने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी केली. त्यांनी २० षटकात ३ विकेट्स गमावत १९९ धावा केल्या.
Comments are closed.