PAK vs BAN: पाकिस्तानचा आशिया कप फायनलमध्ये प्रवेश, बांगलादेशचे स्वप्न भंगलं
BAN vs PAK : गुरुवारी आशिया कप 2025च्या 17व्या सामन्यात पाकिस्तान क्रिकेट संघाने बांगलादेशचा 11 धावांनी पराभव केला. सुपर फोरच्या दुसऱ्या सामन्यात पाकिस्तानने विजय मिळवत आशिया कप 2025 च्या अंतिम फेरीत स्थान निश्चित केले. प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानने 20 षटकांत 8 गडी गमावून 135 धावा केल्या. प्रत्युत्तरात बांगलादेश 20 षटकांत 9 गडी गमावून फक्त 124 धावाच करू शकला. बांगलादेशकडून शमीम हुसेनने सर्वाधिक 30 धावा केल्या. पाकिस्तानकडून शाहीन आफ्रिदी आणि हरिस रौफ यांनी प्रत्येकी 3 बळी घेतले.
लक्ष्याचा पाठलाग करताना बांगलादेशला पहिल्याच षटकात धक्का बसला. इमॉनला खाते उघडता आले नाही. आफ्रिदीला पहिला ब्रेकथ्रू मिळाला. नंतर 5 धावा काढून तौहिदला आफ्रिदीने बाद केले. हरिस रौफने सैफ हसनला (18) बाद केले. मेहदी हसन १० चेंडूत फक्त ११ धावा करू शकला. नुरुल हसनने 21 चेंडूत 16 धावा केल्या. कर्णधार झाकीर अलीने फक्त 5 धावा केल्या. शमीम हुसेनने 25 चेंडूत 30 धावा केल्या आणि बाद झाला. तन्झीम साकिब 11 चेंडूत 10 धावा करून बाद झाला.
प्रथम फलंदाजी करणाऱ्या पाकिस्तानने 20 षटकात 8 गडी बाद 135 धावा केल्या. प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानने 4 चेंडूत फक्त 4 धावा करून साहिबजादा फरहानची विकेट गमावली. सैम अयुब पुन्हा एकदा आपले खाते उघडू शकला नाही. फखर जमान 20 चेंडूत 13 धावा करून बाद झाला. हुसेन तलतने 7 चेंडूत फक्त 3 धावा करून बाद झाला.
पाकिस्तानचा कर्णधार सलमान अलीने 23 चेंडूत 19 धावा केल्या. शाहीन आफ्रिदीने 19 धावा केल्या आणि मोहम्मद हरिसने 31 धावा केल्या. नवाजने 15 चेंडूत 25 धावांची दमदार खेळी केली. फहीम 9 चेंडूत 14 धावा करून नाबाद राहिला. बांगलादेशकडून तस्किन अहमदने तीन बळी घेतले. मेहदी हसन आणि रिशाद हुसेन यांनी प्रत्येकी दोन विकेट घेतल्या.
Comments are closed.