व्ही एस एनझेड; 6 6 6 6 6 6 6 6 6 खिव किवी खेळला, धुतला गेला, आणि पाकिस्तानची चिंता!

पाकिस्तानचा प्रमुख वेगवान गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदी हा प्रतिस्पर्धी संघासाठी मोठा धोका मानला जातो. मात्र, न्यूझीलंडच्या टिम सेफर्टने त्याच्यावर जबरदस्त हल्ला चढवत त्याच्या एका षटकात 26 धावा काढल्या. पावसामुळे सामना 15-15 षटकांपर्यंत झाला, त्यामुळे प्रत्येक चेंडू महत्त्वाचा ठरला. या सामन्यात न्यूझीलंडने पाकिस्तानला सहज पराभूत केले.

सामन्याची सुरुवात शाहीन शाह आफ्रिदीने शानदार केली. त्याने टिम सेफर्टला पहिल्या षटकात एकही धाव काढू दिली नाही आणि मेडन ओव्हर टाकली. त्याच्या अचूक गोलंदाजीमुळे न्यूझीलंडला सुरुवातीला थोडा अडथळा आला. मात्र, सेफर्टने पुढच्या षटकात पूर्ण चित्र बदलून टाकले. आफ्रिदीच्या दुसऱ्या आणि डावाच्या तिसऱ्या षटकात त्याने चौफेर फटकेबाजी केली. एका षटकात 4 षटकार आणि एक दुहेरी धावा घेत त्याने पाकिस्तानच्या गोलंदाजांना बैकफूटवर ढकलले. टीम सेफर्टच्या खेळीने सामना किवींच्या पारड्यात झुकला.

प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानने 15 षटकांत 9 गडी गमावत 135 धावा केल्या. त्यांचा डाव अपेक्षेपेक्षा कमी धावसंख्येवर संपला. मोहम्मद रिजवान आणि फखर झमानने काही चांगली खेळी केली, पण न्यूझीलंडच्या गोलंदाजांनी अचूक मारा करून पाकिस्तानला मोठी धावसंख्या उभारण्यापासून रोखले.

136 धावांचा पाठलाग करताना न्यूझीलंडने सुरुवातीलाच आक्रमक खेळ दाखवला. फिन ऍलन आणि टिम सेफर्टने सुरुवातीच्या षटकांपासूनच मोठे फटके खेळले. विशेषतः सेफर्टच्या खेळीने पाकिस्तानच्या गोलंदाजांची दाणादाण उडवली. त्याने 22 चेंडूत 45 धावा केल्या आणि सामना न्यूझीलंडच्या बाजूने फिरवला. किवी संघाने सामना 13.1 षटकात सामना आपल्या नावे केला.

पाकिस्तानकडून गोलंदाजीत हारिस राैफने सर्वाधिक दोन विकेट्स घेतल्या. त्याने 3 षटकात 20 धावा दिल्या. तर शाहिन आफ्रिदी ,खुशदिल शहा आणि जहांदाद खान यांनी प्रत्येकी एक एक विकेट घेतल्या.

Comments are closed.