पाकिस्तानचे 17 सैनिक बीएलएच्या ताब्यात, कैद्यांची अदलाबदल करण्याची मागणी

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

बलोच लिबरेशन आर्मीने (बीएलए) 17 पाकिस्तानी सैनिकांना ताब्यात घेतल्याचा दावा केला. यातील 10 सैनिकांना सोडून दिल्याचेही म्हटलंय. पाकिस्तानच्या कैदेत असलेल्या बलोच नागरिकांना सोडून दिल्यानंतर उर्वरित सात जणांना सोडण्यात येईल, असे बीएलएने म्हटलंय. त्यासाठी पाकिस्तानला एक आठवडय़ाची मुदत देण्यात आली आहे. हा ‘ऑपरेशन हिरोफ’ चा पार्ट टू असल्याचा दावा बीएलएच्या प्रवक्त्याने केला.

बीएलएने इस्लामाबादला सात दिवसांची मुदत दिली आहे. या काळात कैद्यांची अदलाबदल केली जाईल. आधीच्या अदलाबदल प्रस्तावावर पाकिस्तान नीट काम करत नसल्याचा आरोपही बलोच लिबरेशन आर्मीने केला आहे. बदलीची कार्यवाही सुरू झाली नाही तर कोर्टाने दिलेल्या शिक्षेवर अंमलबजावणी होईल. अद्याप पाकिस्तानच्या सरकारने आणि लष्कराने याबाबत कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

Comments are closed.