काव्या मारनने अबरार अहमदवर खर्च केले कोटी रुपये, द हंड्रेडमध्ये त्याच्या खेळण्याबाबत मात्र शंका

द हंड्रेड लीगचा २०२६च्या हंगामासाठी लिलाव पार पडला. भारतात त्याची फारशी चर्चा होत नाही, मात्र यंदा सनरायझर्स हैद्राबाद फ्रॅंचायजीच्या सनरायझर्स लीड्सने पाकिस्तानच्या खेळाडूला विकत घेतल्याने वाद निर्माण झाला आहे. सनरायझर्स हैद्राबादची मुख्य कार्यकारी अधिकारी आणि सह-मालक काव्या मारनने द हंड्रेडमध्ये पाकिस्तानचा फिरकीपटू अबरार अहमदला संघात घेतले. त्यामुळे अनेकांनी तिच्यावर टीका केल्या. आता अबरार लीगमध्ये खेळण्याची शक्यता मात्र फारच कमी आहे.

सनरायझर्स लीड्सने २०२६च्या द हंड्रेड लीग हंगामासाठी पाकिस्तानी अबरारला सुमारे २.३४ कोटी रुपयांना खरेदी केले आहे. आता या स्पर्धेत त्याचा सहभाग संशयास्पद ठरत आहे. यामागचे कारण आंतरराष्ट्रीय सामने ठरत आहे. या लीगवेळी पाकिस्तान संघाला वेस्ट इंडिजचा दौरा करायचा असल्याने पाकिस्तान क्रिकेट बोर्ड (पीसीबी) त्याला ना हरकत प्रमाणपत्र (एनओसी) देऊ शकणार नाही. पाकिस्तान १५ जुलै ते ७ ऑगस्ट दरम्यान दोन कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे. तसेच द हंड्रेड लीग २१ जुलै ते १६ ऑगस्टपर्यंत खेळली जाणार आहे.

काही रिपोर्ट्सनुसार, पाकिस्तान वेस्ट इंडिजविरुद्ध दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. त्यामुळे अबरार द हंड्रेडमध्ये खेळू शकणार नाही. एका सूत्राने सांगितले, “त्याचे पाकिस्तान क्रिकेट बोर्डशी संबंध चांगले आहेत आणि त्याला एनओसी मिळू शकतो. त्याच्या एजंटनेच त्याचे नाव लिलावामध्ये टाकले होते. त्यामुळे द हंड्रेड लीगमध्ये त्याच्या खेळण्याची ५०-५० टक्के शक्यता आहे.”

सनरायझर्स लीड्सचे मुख्य प्रशिक्षक डॅनियल व्हेटोरी यांनी स्पष्ट केले की, दर्जेदार फिरकी गोलंदाजांच्या अभावामुळे, विशेषतः इंग्लंडच्या आदिल रशीदला वगळल्यानंतर, संघाने अबरार अहमदला करारबद्ध केले. तो सध्या टी२० मध्ये उत्तम कामगिरी करत आहे. यामुळेच त्याला संघात घेतले गेल.

Comments are closed.