मोठी बातमी – पाकिस्तानचा अफगाणिस्तानमध्ये मोठा हल्ला; काबूलमधील रुग्णालयावर एअरस्ट्राईक, 400 जणांचा मृत्यू

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

पाकिस्तानने अफगाणिस्तानची राजधानी काबूलमधील एका रुग्णालयावर एअरस्ट्राईक केला आहे. या भयंकर हल्ल्यात 400 जणांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. तालिबान प्रशासनाने याबाबत माहिती दिली आहे. या हल्ल्यानंतर सर्वत्र हाहाकार माजला आहे.

तालिबानचे प्रवक्ते हम्दुल्ला फित्रत यांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी रात्री 9 च्या सुमारास पाकिस्तानी हवाई दलाने काबूलमधील ‘ओमीद नशामुक्ती रुग्णालया’वर (Omid Addiction Treatment Hospital) बॉम्ब टाकले. हे रुग्णालय खूप मोठे असून इथे एका वेळी दोन हजाराहून अधिक रुग्ण उपचार घेत असतात. या हल्ल्यात रुग्णालयाचा एक मोठा भाग उद्ध्वस्त झाला आहे. ढिगाऱ्याखाली अनेकजण गाडले गेले आहेत. अफगाणिस्तानच्या आरोग्य मंत्रालयाने मृतांची संख्या ४०० पर्यंत पोहचल्याचे सांगितले आहे.

Comments are closed.