हिंदुस्थाननं हल्ला केला किंवा सिंधूचं पाणी रोखलं तर आम्ही अण्वस्त्रांनी प्रत्युत्तर देऊ; सैरभैर पाकड्यांची पुन्हा दर्पोक्ती

पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यापासून हिंदुस्थान आणि पाकिस्तान या दोन अण्वस्त्रधारी देशांमधील तणाव वाढतच चालला आहे. हिंदुस्थानच्या हल्ल्याच्या भीतीने पाकिस्तान सैरभैर झाला असून रोजच अणूहल्ल्याची पोकळ धमकी देत आहे. पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांच्यानंतर आता पाकिस्तानचे रशियातील राजदूत मोहम्मद खालिद जमाली यांनीही अणूहल्ल्याची धमकी दिली आहे.

हिंदुस्थानने पाकिस्तानवर हल्ला केला किंवा सिंधू नदीचे पाणी रोखले तर पाकिस्तान फक्त पारंपारिक शस्त्रांनीच नव्हे तर अण्वस्त्रांनी प्रत्युत्तर देईल, अशी दर्पोक्ती मोहम्मद खालिद जमाली यांनी केली. रशियातील टीव्ही चॅनेल आरटीसोबत ते बोलत होते.

हिंदुस्थानच्या लष्करी कारवाईच्या योजनांबाबत आमच्याकडे ठोस पुरावे आहेत. लीक झालेल्या कागदपत्रांवरून पाकिस्तानच्या काही भागांवर हल्ला करण्याची हिंदुस्थानची योजना आहे. तसेच हल्ल्याची वेळ जवळ आली आहे आणि हल्ला कधीही होऊ शकतो, असेही खालिद जमाली म्हणाले.

हिंदुस्थानच्या हल्ल्याला पारंपारिक आणि अण्वस्त्रांनी प्रत्युत्तर देऊ. हिंदुस्थानने सिंधू नदीचे पाणी रोखले किंवा वळवले तर त्याला पाकिस्तानविरुद्ध अॅक्ट ऑफ वॉर मानले जाईल आणि आम्ही त्याला पूर्ण ताकदीने उत्तर देऊ, अशी दर्पोक्तीही त्यांनी केली.

सिंधूचे पाणी रोखले तर पाकिस्तान हल्ला करेल; ख्वाजा आसिफ यांची पुन्हा दर्पोक्ती

हिंदुस्थान आणि पाकिस्तान दोन्हीही अण्वस्त्रधारी देश आहेत. त्यामुळे तणाव कमी होणे आवश्यक आहे, असे म्हणत कश्मीरच्या पहलगाम येथे झालेल्या हल्ल्याची तटस्थपणे चौकशीची मागणीही त्यांनी केली. यासाठी चीन आणि रशियानेही पुढाकार घ्यावा असेही ते म्हणाले.

पाकिस्तानची आर्थिक नाकेबंदी!आयात बंद, टपाल आणि पार्सल सेवाही रोखली

Comments are closed.