पाकिस्तानच्या लष्करप्रमुखांना जर्मनीत गेटवरच रोखले, आसीम मुनीर यांचा सुरक्षारक्षकांकडून अपमान

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

पाकिस्तानच्या लष्करप्रमुखांना जर्मनीमध्ये आयडी कार्ड दाखवण्यास सांगण्यात आले. सुरक्षारक्षकांनी आसीम मुनीर यांना गेटवरच रोखले. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

आसीम मुनीर हे जर्मनीत म्युनिच सुरक्षा परिषदेत सहभागी होण्यासाठी गेले होते. कार्यक्रमाच्या ठिकाणी प्रवेश करताना तिथल्या स्थानिक सुरक्षारक्षकांनी त्यांना ओळखले नाही. इतकेच नाही, तर प्रोटोकॉलनुसार त्यांना आत सोडण्यापूर्वी सुरक्षारक्षकांनी त्यांच्याकडे ओळखपत्राची मागणी केली. या घटनेचा व्हिडीओ समोर आल्यानंतर पाकिस्तानची जगभरात मोठी नाचक्की होत आहे. व्हिडीओमध्ये स्पष्ट दिसत आहे की, सुरक्षारक्षक मुनीर यांना थांबवून काही विचारत आहेत.

यापूर्वीही लंडनमध्ये मुनीर यांच्याविरुद्ध निदर्शने झाली होती

आसीम मुनीर यांच्या मानहानीची ही पहिलीच वेळ नाही, असा दावा करण्यात येतोय. यापूर्वीही लंडनमध्ये मुनीर यांच्याविरुद्ध निदर्शने झाली होती. जर्मनीतील या घटनेमुळे पाकिस्तानच्या लष्करी मुत्सद्देगिरीवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याची चर्चा होतेय.

Comments are closed.